esakal | दिलासादायक..जळगाव जिल्ह्याची गंभीर रुग्णांची संख्या आली दोन हजारावर
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक..जळगाव जिल्ह्याची गंभीर रुग्णांची संख्या आली दोन हजारावर

दिलासादायक..जळगाव जिल्ह्याची गंभीर रुग्णांची संख्या आली दोन हजारावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जिल्ह्यात कोरोना (corona) संसर्गाचा आलेख स्थिर होत असताना आता गंभीर रुग्णांचे (criticallyl patients) प्रमाणही कमी (Low) होत आहे. ऑक्सिजन (oxygen) व आयसीयूतील (icu) रुग्णसंख्या कमी होऊन ती दोन हजारांच्या आत आली आहे. दिवसभरात १४ मृत्यू (death) झालेत, तर नवे ८४३ रुग्ण आढळून आले.


(corona critically patients number low Jalgaon district over two thousand)

हेही वाचा: उत्तराखंडमधील जागेश्वर धाम आहे प्रसिध्द ? कशासाठी तर वाचा !

जळगाव जिल्ह्यात गेल्या जवळपास महिनाभरापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. तीन-चार आठवड्यांपासून दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.
मंगळवारी प्राप्त ६ हजार ७७१ चाचण्यांच्या अहवालातून ८४३ नवे रुग्ण समोर आलेत. एकूण रुग्णसंख्या १ लाख ३१ हजार ५७४ झाली असून ७४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १९ हजार ३०८ झाला आहे. दोन दिवसांपासून दररोजच्या मृत्युंची संख्याही थोडी कमी झाली आहे. मंगळवारी १४ जणांचा बळी गेला, त्यामुळे बळींचा एकूण आकडा २३६३वर पोचला आहे. मंगळवारी सारी, कोरोना संशयित, नॉन कोविड, न्युमोनिया आधी आजारांनी ९ जणांचा बळी गेला.

हेही वाचा: 'बेंगलुरू पॅलेस' मध्ये सुपरहिट चित्रपटांचे झाले चित्रीकरण; घ्या जाणून !

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर ६९, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ८९, अमळनेर ९४, चोपडा १०७, पाचोरा ७९, भडगाव ३, धरणगाव २६, यावल २०, एरंडोल २८, जामनेर ६४, रावेर ५१, पारोळा १४, चाळीसगाव ६२, मुक्ताईनगर ६३, बोदवड ४२, अन्य जिल्ह्यातील ७.

(corona critically patients number low Jalgaon district over two thousand)