esakal | कोरोनाचा कहर थांबेना! बत्तीस वर्षीय तरुणासह जळगावात ८ मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona deth
कोरोनाचा कहर थांबेना! बत्तीस वर्षीय तरुणासह जळगावात ८ मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला संसर्ग दर स्थिर आहे. बुधवारी नव्या ११४२ रुग्णांची नोंद झाली तर ११३४ बरे झाले. जळगाव शहरात तब्बल ८ जणांचा बळी गेला, त्यात एका ३२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर जिल्ह्यात दिवसभरातील मृत्युंची संख्या २२ नोंदली गेली. तर जामनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण समोर आले.

हेही वाचा: जळगाव शहरात आता मनपा तयार करणार ‘मायक्रो कंटेंटमेंट झोन’

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता कायम आहे. बुधवारी सलग सहाव्या दिवशी वीसपेक्षा अधिक बळी गेले. २२ मृत्युंपैकी जळगाव शहरातील ८ जणांचा तर भुसावळ व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी ४ जणांचा समावेश आहे. बळींचा आकडा दोन हजारांच्या टप्प्यात पोचला असून आजअखेर १९९८ मृत्युंची नोंद आहे.

जिल्ह्यात नवीन ११४२ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १ लाख १२ हजार ६७० झाली आहे. तर ११३४ रुग्ण दिवसभरात बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ९९ हजार ५५४ वर पोचला आहे.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

जामनेर बनतोय हॉटस्पॉट

गेल्या काही दिवसांपासून जळगावसह चोपडा तालुक्यातील रोजची रुग्णसंख्या स्थिर असली तरी आता जामनेर तालुका नवीन हॉटस्पॉट बनतोय. जामनेरात बुधवारी २८७ रुग्णांची नोंद झाली. जळगाव शहरात बुधवारी नवे १८९ रुग्ण सापडले तर त्यापेक्षा अधिक म्हणजे २०८ रुग्ण बरे झाले.

अन्य ठिकाणचे रुग्ण असे :

जळगाव ग्रामीण ३९, भुसावळ ११४, अमळनेर ३५, चोपडा १०५, पाचोरा ६६, धरणगाव १८, यावल २७, एरंडोल ६५, रावेर १०४, पारोळा ३१, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ३८, बोदवड १, अन्य जिल्ह्यातील ५.

हेही वाचा: जळगावच्या बाजारपेठांमध्ये सकाळी गर्दी, दुपारी शुकशुकाट

चाचण्याही वाढल्या

मंगळवारी विक्रमी १७ हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. बुधवारीही चाचण्यांचे प्रमाण अधिक राहिले. १२९१ आरटीपीसीआर व १३१५१ रॅपिड ॲन्टीजेन अशा एकूण १४ हजार ४४२ चाचण्यांचे अहवाल आज प्राप्त झाले.

संपादन- भूषण श्रीखंडे