पावसाअभावी पिकांनी टाकली मान;पिके उपटून फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

१५ ते २० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिके आता माना टाकू लागले आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.
Farmer
Farmer



जळगाव : शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने ( No Rain) ओढ दिली आहे. यामुळे खरीप हंगाम संकटात आला आहे. गेल्या महिन्यात एक-दोनदा चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांना (Kharip Crop) जीवदान मिळाले होते. आता मात्र पाऊसच नसल्याने जमिनीतील ओल संपली आहे. यामुळे उडीद, तूर, मूग पिकांचे शंभर टक्के नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, मंगळवार (ता. १७) ते रविवार (ता.२२) दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.

Farmer
भंगार विक्रीतून कमावले ३९१.४३ कोटी;मध्य रेल्वेचे झिरो`स्क्रॅप`मिशन


श्रावणमास म्हटला, की पाऊस व उन्हाचा लंपडाव असतो, असे वर्णन बालकवींनी कवितेत केले आहे. मात्र यंदा श्रावणात चक्क उन्हाळ्याचा असह्य उकाडा जाणवत आहे. खरीप हंगाम पावसावरच अवलंबून असतो. जूनच्या सुरवातीस पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने ओढ दिली. परत पाऊस बऱ्यापैकी झाला. यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. जुन्या पेरण्यांना जीवदान मिळाले, असे असताना १५ ते २० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिके आता माना टाकू लागले आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी चुहा पद्धतीने पाणी देत आहे.

Farmer
अ‍ॅड.पाटील हे जेष्ठ संचालक त्यांचा राजीनामा नामंजूर-रोहिणी खडसे

पिक जळू लागले
अगोदरच्या पावसाच्या खंडाने ३० टक्के उडीद, मुगाची पिके वाया गेली होती. आता पुन्हा खंड पडल्याने पिके पिवळी पडून जळू लागली आहेत. हा हंगाम हातचा गेला, तर उडीद, मुगाचे यंदा उत्पादनच येणार नसल्याची चिंताजनक स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने उडीद, मुगाच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.


पन्नास टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे
ज्या महसूल मंडळात उडीद, मुगाच्या पिकांचे पन्नास टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी संबंधित विमा कंपन्यांना पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘सकाळ’ला दिली. महसूल मंडळात ज्यांनी पीकविमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांच्या महसूल मंडळाचे नुकसान नजरेने पाहून त्यांना पीकविम्याच्या पंचवीस टक्के रक्कम महिनाभरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिनाअखेरीस उडीद, मूग काढणीला येतात. ते काढणेवेळी प्रत्यक्षात किती उत्पादनात घट येते त्यावरून इतर नुकसानभरपाई देण्यात येईल.

Farmer
अमळनेरमध्ये १०५ फुटांवर फडकला "तिरंगा"


असोद्यासह जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या उडीद, मुगाचे पावसाअभावी शंभर टक्के नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन भरपाईची रक्कम द्यावी.
- किशोर चौधरी, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com