खडसेद्वयी..आमदारांच्या कोविड काळातील कामांची स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडसेद्वयी..आमदारांच्या कोविड काळातील कामांची स्पर्धा

खडसेद्वयी..आमदारांच्या कोविड काळातील कामांची स्पर्धा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : कोविड रुग्णालयासह (covid hospital) रुग्णाच्या नातेवाइकांना सुविधा पुरविण्याची स्पर्धा (Competition to facilitate) सुरू असताना आता मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार, खासदार व भावी आमदारांपैकी कुणाचे योगदान सरस, यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण (online survey) घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. काही कार्यकर्ते त्यासाठी यंत्रणा राबवत असून, या सर्वेक्षणाद्वारे मतदान घेऊन या तिघांमध्ये कोण श्रेष्ठ, हे ठरविणार असल्याचे सांगितले जात आहे.

(muktainagar constituency mla, mp and future mlas Competition covid facilitate)

हेही वाचा: जळगाव शहरात सक्रिय रुग्ण हजाराच्या आत..पण मृत्यूने चिंता कामय

मुक्ताईनगर मतदरसंघात सध्या आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्यासह खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) , जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर (District Bank President Rohini Khadse- Khewalkar) यांच्यात कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विविध सुविधा पुरविण्याची चढाओढ सुरू आहे. रुग्णाच्या मदतीसाठी आमदारांनी टेंट टाकला असून, तिथून सेवा पुरवली जात आहे. रक्षा खडसेंनी रुग्णाच्या नातेवाइकांना पाणी व निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे, तर रोहिणी खडसेंनी नाश्ता, चहाची व्यवस्था केली आहे. स्वतंत्र कोविड सेंटरही त्यांनी सुरू केले आहे. याशिवाय मतदारसंघात संपर्क व विविध कामे मार्गी लावण्यातही हे तिघे व्यस्त आहेत.

ऑनलाइन सर्व्हे

या मुद्यांच्या आधारे काही राजकीय कार्यकर्ते ऑनलाइन सर्व्हे घेत आहेत. त्यात, या तिघांपैकी कुणाची सेवा चांगली, याबाबत प्रश्न दिले असून, त्यावर मतदानही घेण्यात येत आहे. या सर्व्हेद्वारे एकाचे वर्चस्व सिद्ध करण्याची योजना असून, त्यासाठी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात केळी, वांगीचे क्षेत्र वाढवा !

तिघा पक्षांचा बोलबाला

सध्या या मतदारसंघात आमदार म्हणून शिवसेना, खासदार म्हणून भाजप व माजी मंत्री एकनाथ खडसेंमुळे (Eknath Khadse) राष्ट्रवादी या तिघा पक्षांमध्ये वर्चस्वाची चांगलीच चढाओढ लागल्याचे दिसत आहे.

loading image
go to top