‘म्युकरमायकोसिस’बाबत जानेवारीत होते संकेत; टास्‍क फोर्सच्या सूचनांकडे दुर्लक्ष

‘म्युकरमायकोसिस’बाबत जानेवारीत होते संकेत; टास्‍क फोर्सच्या सूचनांकडे दुर्लक्ष
mucormycosis
mucormycosissakal

जळगाव : कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या (Coronavirus) आजारांमधील जीवघेण्या ‘म्युकरमायकोसिस’चा (mucormycosis) संभाव्य परिणाम व संसर्गाबद्दल जळगावातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सने जानेवारी महिन्यात काही सूचना केल्या होत्या. या आजाराबाबत इशारा देत त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या शिफारशीकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे वृत्त समोर येत आहे. अर्थात, आरोग्य यंत्रणा अथवा प्रशासनाने त्याबाबत मौन बाळगले आहे. (Signs of mucormycosis occur in January Ignore Task Force instructions)

mucormycosis
कोरोनाने केले पोरके..आई- वडिलांच्या मृत्‍यूने आठ मुले पोरकी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. संसर्ग आणि मृत्यू या दोन्ही घटकांत दुसऱ्या लाटेत मोठी जीवितहानी झाली आहे. विशेष म्हणजे, या दुसऱ्या लाटेत होणाऱ्या बाधितांमध्ये कोविड बरा झाल्यानंतरही जीवघेणे आजार वाढीस लागल्याची अनेक उदाहरणे समोर येत असून, त्यात सर्वाधिक गंभीर स्वरूपाच्या ‘म्युकरमायकोसिस’चाही समावेश आहे.

‘म्युकर’चे रुग्ण वाढले

राज्यात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यातही ‘म्युकर’चे रुग्ण समोर येऊ लागले असून, त्यांचे बळीही जात आहेत. ‘म्युकर’वरील उपचारासाठी आता शासनाने दिशानिर्देश दिले असून, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कक्ष, कृती दल स्थापन करण्याबाबत निर्देशही दिले आहेत. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात गेल्या आठवड्यात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नेतृत्वात या रोगावरील कृती दल स्थापन होऊन स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला.

mucormycosis
जळगावला नवे बाधित पाचशेच्या टप्प्यात पण दिवसभरात ११ बळी

जानेवारीतच केल्या होत्या सूचना

शासन असो की, प्रशासन या यंत्रणांना ‘म्युकर’बाबत उशिरा जाग आल्याचे दिसून येते. जळगाव जिल्ह्यात कोविडवर काम करणाऱ्या टास्क फोर्सने ‘म्युकरमायकोसिस’बाबत जानेवारी महिन्यातच आरोग्य यंत्रणेला इशारा दिला होता. या रोगावरील उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची शिफारस फोर्सने केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली होती, असेही बोलले जात आहे. मात्र, या सूचना, शिफारशींकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आणि आता चार महिन्यांनी म्युकरमायकोसिसचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला.

केवळ चर्चा झाल्याचा दावा

या संदर्भात टास्क फोर्समधील एका डॉक्टर सदस्याशी संपर्क केला असता त्याने मात्र अशा प्रकारच्या सूचना केल्याचा इन्कार केला. टास्क फोर्सच्या एका बैठकीत म्युकरमायकोसिसबाबत चर्चा झाली होती. काही मुद्देही समोर आले होते, त्यादृष्टीने काम करण्याचे नियोजनही होते, अशी कबुलीही या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com