ऑनलाइन नोकरी शोधणे तरुणीला पडले महागात !

काही वेळातच या तरुणीस अनोळखी नंबरवरून फोन येऊन नोकरीबाबत माहिती देण्यास सुरवात झाली.
Cyber ​​crime
Cyber ​​crimeCyber ​​crime

जळगाव : शहरातील मोहाडी रोड, आनंदनगरातील रहिवासी तरुणी ऑनलाइन (Online) नोकरीसाठी (Job) अर्ज करत असल्याने, सायबर गुन्हेगारांनी (Cyber ​​criminals) नोकरीचे आमिष देत विविध कारणांसाठी या तरुणीकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळले आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा (Frode Crime) दाखल करण्यात आला आहे.

(online job search young lady cyber ​​criminals cheating frode)

Cyber ​​crime
संतापजनक घटना..कैऱ्या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले


जळगाव शहरातील मोहाडी रोड, आनंदनगरातील रहिवासी तरुणी धनश्री भावसार (वय २३) नोकरी डॉट कॉम या ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून नोकरीसाठी प्रयत्न करत होती. गुरुवारी (ता. ३) या तरुणीने नोकरी डॉट कॉम या साइटवर नोकरी मिळावी, यासाठी नोंदणी केली. यानंतर काही वेळातच या तरुणीस अनोळखी नंबरवरून फोन येऊन नोकरीबाबत माहिती देण्यास सुरवात झाली.

वेगवेगळे कारणे सांगून मागवले पैसे

प्रोसेसिंग फी, रजिस्टेशन आणि विविध कारणांसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी या तरुणीकडून सकाळी ११ ते रात्री आठच्या दरम्यान दरवेळी वेगवेगळे कारण सांगून सुमारे एक लाख ३८ हजार ७८० रुपये ऑनलाइन पद्धतीने मागवले.

Cyber ​​crime
जळगाव जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या आता शंभरावर !

गुन्हा दाखल

यानंतर संपर्क केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com