esakal | जळगावातील रेमडेसीव्हिर, अन्य औषधी साठा रोज तपासला जाणार

बोलून बातमी शोधा

medicine
जळगावातील रेमडेसीव्हिर, अन्य औषधी साठा रोज तपासला जाणार
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव ः खाजगी रुग्णालये, रुग्ण यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी उपविभाग निहाय पथके तयार करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी काढले आहेत. या पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची नियुक्ती यांनी केली आहे.

हेही वाचा: लिपीकाची कमाल; बायको, शालकाच्या खात्यात लाखो रुपये वर्ग करून केला घोटाळा

खासगी रुग्णालयात रुग्णांना प्रवेश देतांना होणारा विलंब, त्यांना देण्यात येणारे भोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्‍त केलेली असून खासगी रुग्णालयात रुग्णांची तसेच रुग्णालय प्रशासन यांच्या मध्ये समन्वय साधनेसाठी या रुग्णालयावर शासकीय प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळेच तालुक्यातील कोविड रुग्णालयांवर नजर ठेवण्यासाठी उपविभागनिहाय पथक गठीत करण्याचे आदेश आहेत.

हेही वाचा: राज्यातील ६६ वर शिक्षकांचा कोरोना सेवेत मृत्यू

असे असेल पथक

उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तालुकानिहाय खाजगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवणेकामी त्यांच्या अध्यक्षतेखाली पथक स्थापन करावे. या पथकात सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा उपनिबंधक विभाग किंवा इतर शासकीय कार्यालयातील वर्ग १ किंवा वर्ग २ अधिकारी यांची आपल्या तालुक्‍यातील खाजगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेऊन दोन किंवा तीन रुग्णालयासाठी एक अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्‍ती करावी. त्यांना मदत करणेकामी इतर विभागातील अन्य कर्मचारी यांची नियुक्‍ती करणेत यावी.

अशी असेल जबाबदारी

- खासगी रुग्णालयातील व रुग्ण यांच्यात समन्वय ठेवणे

- तक्रारीबाबत समन्वय साधून निराकरण करावे

- देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत तपासणी करावी

- रुग्णांना प्रवेश व डिस्चार्जबाबत येणाऱ्या अडचणी सोडवणे

- देयकांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने लेखापरीक्षण करुन घेणे

- भोजन व इतर सुविधा यांची तपासणी करणे.

- रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सीजनची मात्रा निकषानुसार आहे का ते तपासणे

- रेमडेसिव्हर, कोविड औषधांचा आवश्यकतेनुसार वापरावर लक्ष ठेवणे

- रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणे

हेही वाचा: कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा

भारदेंना कार्यवाहीचा अधिकार

उपजिल्हाधिकारी भारदे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांनी विभागनिहाय पथक स्थापन केलेले आहे किंवा नाही यांची पडताळणी करणे. पथकाद्वारे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल प्राप्त करुन या पथकावर नियंत्रण ठेवावे. रुग्णालय प्रशासन व रुग्णांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करावी.

संपादन- भूषण श्रीखंडे