esakal | 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला महापौरांच्या घरापासून सुरुवात !
sakal

बोलून बातमी शोधा

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला महापौरांच्या घरापासून सुरुवात !

प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करावी, कुणीही आजारी असल्यास त्यांची माहिती घेऊन शासन निर्देशानुसार टेस्ट करण्यास घेऊन जावे. कोणत्याही व्यक्तीची माहिती अंदाजे भरू नये.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला महापौरांच्या घरापासून सुरुवात !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव :  शहर कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने जळगाव शहराचे प्रथम नागरीक महापौर भारती सोनवणे यांच्या घरापासून तपासणीला सुरवात करत मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. महापौरांनी स्वतः कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बोलावून त्यांची तपासणी करून घेतली.

आवर्जून वाचा ः सोने पून्हा महागले, एका दिवसात सहाशे रुपयांनी वाढले भाव   
 

जळगावात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दोन दिवसापूर्वी महापौर भारती सोनवणे यांनी बैठक घेतली होती. शहरात १५१ पथकाकडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. बुधवारी सकाळी मनपाच्या पथकाकडून प्रत्यक्षात तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

महापौरांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावून तपासणी करून घेतली. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करावी, कुणीही आजारी असल्यास त्यांची माहिती घेऊन शासन निर्देशानुसार टेस्ट करण्यास घेऊन जावे. कोणत्याही व्यक्तीची माहिती अंदाजे भरू नये अशा सूचना महापौरांनी केल्या.

संबधित बातमी ः जळगाव मनपात अधिकाऱयांच्या भोंगळ कारभारावर सदस्यांनी ओढले ताशेरे !
 

नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर
जळगावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात झाली आहे. आपल्या कुटुंबाला मनपाचे पथक भेट देतील तेव्हा नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तपासणी करून आजाराची संपूर्ण मोहिमेत माहिती द्यावी. असे आवाहन महापौरांनी केले आहे.
 

loading image