esakal | जळगावचे ६३ वर्षीय अशोकराव अठराशे किलोमीटर अनवाणी पायी निघाले मोदींच्या भेटीला !
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावचे ६३ वर्षीय अशोकराव अठराशे किलोमीटर अनवाणी पायी निघाले मोदींच्या भेटीला !

६३ वर्षीय वृध्द अठराशे किलोमीटर अनवाणी पायी पाठीवर ओझे घेऊन विश्वकल्याणासाठी, भारत निरोगी व सुदृढ व्हावा, सैनिकांचे मनोबल वाढावे ,कोरोना मुक्त भारत लवकर व्हावा यासाठी पाई निघाले.

जळगावचे ६३ वर्षीय अशोकराव अठराशे किलोमीटर अनवाणी पायी निघाले मोदींच्या भेटीला !

sakal_logo
By
रोहिदास मोरे

अडावद ः  साळवा तालुका धरणगाव येथील मूळ रहिवासी व पुणे येथे वास्तव्यास असणारे 63 वर्षीय अशोक माधव कोल्हे हे येशू ख्रिस्तांचे सेवक आहेत . ते 17 सप्टेंबर रोजी साळवा तालुका धरणगाव येथून सुमारे अठराशे किलोमीटर अंतर चक्क पायी चालत साळवा - रोटवद - सावखेडा - चोपडा - शिरपूर - बिजासनी - सेंधवा - प्रितमपुर - इंदोर- उज्जैन - कोटा -आग्रा मार्गे दिल्ली पंतप्रधानांच्या भेटीला निघाले आहेत.

आवर्जून वाचा ः  खडसे शिवसेनेत येण्याचा विषय गुलाबराव बघून घेतील !
 

येशूची इच्छा व आज्ञा पूर्ण करण्यासाठी तसेच करोडो भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, भारत चीनचे संबंध दूर करण्यासाठी, कोरोना मुक्त भारत होण्यासाठी आपण प्रार्थना करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जसे येशूने सारे मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले आणि त्या पापाचे पापी बनून स्वतःला सजा घेऊन मृत्यू सहन केला त्याप्रमाणे परमेश्वराने माझी सेवक म्हणून निवड केली असून त्यांच्या कार्यानुसार साऱ्या मानव जातीतील आणि महात्मा गांधी यांच्या झाडूने पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान पूर्ण केले त्याचप्रमाणे बाहेरच्या देशातून आलेला कोरोना व्हायरसला पराजित व लज्जित करून परत त्यांच्या देशात परतवून लावण्याची ताकद प्रार्थनेत असल्याचे म्हणाले. तसेच लॉक डाऊन मध्ये अडकलेले सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत, लोक पुन्हा निरोगी व सुखी जीवन जगावे म्हणून माझी आहे असे त्यांनी सांगितले.

चार सिमांना देणार भेट

दया - शांती - कृपा - सहकार्य - सत्य - प्रेम सर्वांनी आनंदाने घ्यावे. लीन व नम्रता होऊन मी पंतप्रधानांची भेट घेऊन संकल्प व योजना सांगणार आहे व रक्षा मंत्री तसेच सैनिक अधिकारी यांच्या भेटी घेऊन देशातील चारही सीमांना भेटी देणार आहे.

नक्की वाचा ः अरे व्वा जळगाव जिल्ह्यातील दहा प्रकल्पे ओव्हरफ्लो !
 

63 वर्षीय व्यक्ती अठराशे किलोमीटर अनवाणी पायी पाठीवर ओझे घेऊन विश्वकल्याणासाठी निघाला असून भारत निरोगी व सुदृढ व्हावा , सैनिकांचे मनोबल वाढावे ,कोरोना मुक्त भारत लवकर व्हावा अशा विविध बाबींसाठी आपले मिशन असल्याचे अशोक कोल्हे यांनी सांगितले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image