esakal | अट्टलगुन्हेगाराने सख्या बहिणीच्या घरावर मारला ‘डाका’..आणि पुणे-मुंबईत एैश
sakal

बोलून बातमी शोधा

Police Arrest

अट्टलगुन्हेगाराने सख्या बहिणीच्या घरावर मारला ‘डाका’..

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव ः सिंधी कॉलनीतील पवन हिरालाल लालवाणी यांचे घर बनावट चावीने उघडून कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरीला गेला होता. घडल्या प्रकाराचा गुन्हा दाखल होवुन पवन आणि त्याची पत्नी खुशी यांनी शालक आणि सासऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा संशय व्यक्त केला हेाता. बहिणीच्या माहितीवरुन पोलिसांनी भाऊ भारत अनिल कुकरेजा याला अटक (Police Arrest) केली. त्याने चोरीचे सोने एका खासगी बँकेत तारण ठेवून ४५ हजार मौज मस्तीत उडवल्याची कबुली (Thief)दिली आहे.

हेही वाचा: अखेर..दीड वर्षांनंतर महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील बस सेवा पुन्हा सुरू


पवन ललवाणी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत घरफोडीचा गुन्हा करण्यात आला हेाता. दाखल गुन्ह्यात पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी स्वतः चौकशी करुन तक्रारदार पवन त्याची पत्नी खुशी या दोघांकडून माहिती घेतली. खुशीने सख्खा भाऊ अनिल कुकरेजा आणि त्याच्या वडीलांवर (सासरे) अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगीतले होते. त्या दिशेने तपासाला सुरुवात होऊन गुन्हा घडल्या पासून पसार असलेल्या भारत अनील कुकरेजा याचा पोलिस शोध घेत होते. उल्हासनगर व तेथून तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. आज (ता.२) गुरुवारी जळगाव शहरात येत असल्याची खात्री होताच निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, सचिन पाटील या पथकाने घरी येताच त्याला ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील लॉकेट त्याने काढून दिले. इतर सोनं मात्र तो कबुलच करत नव्हता म्हणुन त्याला प्रसादही देण्यात आला.

हेही वाचा: धुळ्यात कचरा प्रश्न पेटला..नागरिक कचरा घेऊन पोहचले आयुक्त दालनात



चेारीचे सोन ठेवले गहाण
सख्या बहिणीकडे डाका टाकून भारत कुकरेजा याने चोरुन आणलेले सोने एका खासगी बँकेत थेट गहाण ठेवुन ४५ हजार रुपये घेत उल्हास नगर गाठले, मुंबई नंतर तेथून तो पुण्यात गेला ऐश मौज करण्यात त्याने सर्व पैसा उडवल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

loading image
go to top