esakal | .. अन्‌ शहांच्या प्रचाररथावर महाजनांना स्थान !

बोलून बातमी शोधा

West Bengal Election Campaign Rally Amit Shah Girish Mahajan
.. अन्‌ शहांच्या प्रचाररथावर महाजनांना स्थान !
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : पश्‍चिम बंगालमधील निवडणूक रणसंग्राम शिगेला पोचलेला असताना राज्यातून नियोजनासाठी गेलेल्या गिरीश महाजनांना सोमवारी भाजपनेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांच्यासोबत रोड शोच्या प्रचाररथावर बोलावून घेतले. ‘ये गिरीशभाई महाराष्ट्र से आए है भाजपा को जिताने के लिए.. ताली बजाओ इनके लिए.. असे सांगत शहांनी महाजनांचा गौरव केला.

हेही वाचा: नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ! यावर भाजप आमदार म्हणाले, 'बात दूर तक जायेगी'

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक देशभरात विविध कारणांनी गाजतेय. तीन टर्मपासून सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर यावेळी प्रथमच भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. देशभराती विविध भागातून भाजपचे नेते नियोजनासाठी बंगालमध्ये गेले असून महाराष्ट्रातून माजी मंत्री गिरीश महाजन गेल्या दोन आठवड्यांपासून निवडणुकीच्या नियोजनात सक्रिय आहे.

हेही वाचा: दीड वर्षापूर्वी हरवली..आणि प्रामाणिकपणामूळे सुखरूप मिळाली

शहांच्या ‘रोड शो’चे नियोजन

सोमवारी भाजपनेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पश्‍चिम बंगालमधील बालूरघाट मतदारसंघात रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शोचे नियोजन गिरीश महाजनांकडे होते. त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे रोड शोचे नियोजन केले. अमित शहांची या रोड शोदरम्यान रॅली सुरु झाली आणि रॅलीत ‘जय श्रीराम’चा जयघोष झाला.

हेही वाचा: मनपा प्रशासन झोपेतच; ट्रेसिंग, टेस्टिंग विलगीकरणापर्यंतच मजल

महाजनांना प्रचाररथावर बोलावले

रोड शोच्या नियोजनात व्यस्त गिरीश महाजनांना पाहून अमित शहांनी माईकवर ‘गिरीश महाजन उपर आजाओ भाई..’ असे जाहीर करत महाजनांना प्रचाररथावर बोलावून घेतले. मतदारसंघातील उमेदवार व रॅलीत सहभागी मतदारांना आवाहन करताना शहा यांनी ‘ये गिरीशभाई महाराष्ट्र से आए है..’ असे सांगत महाजनांचा सन्मान केला. त्यासंबंधीचा व्हीडीओ आणि छायाचित्रेही आज सोशल मीडियावर व्हायरल झाली.

संपादन- भूषण श्रीखंडे