esakal | पाचोऱ्यात रात्रीचा थरार..एटीएम चोरण्याचा चोरांचा प्रयत्न फसला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पाचोऱ्यात रात्रीचा थरार..एटीएम चोरण्याचा चोरांचा प्रयत्न फसला

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा ः पाचोरा येथे मंगळवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास स्टेट बँकेचे (State Bank) एटीएम (ATM) चोरून नेण्याचा चोरट्यांचा (thieves) प्रयत्न फसला. चोरटे एटीएमचा समोरील काच फोडल्यामुळे झालेल्या आवाजामूळे नागरिकांना जाग आली. आणि लगेच पोलिस (Pachora police) परंतू चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यास यशस्वी झाले. (thieves attempt break atm failed pachora police chase)

हेही वाचा: महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली!

पाचोरा येथील भडगाव रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएमचा काच फोडल्याने शेजारी असलेले आशीर्वाद प्लाझाचे मालक मुकुंद बिल्दीकर यांना जाग आली व त्यांनी लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले.बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

हेही वाचा: मंत्री गुलाबराव पाटील..स्वःताची पाठ थोपटून घेतायं !

पोलिस कर्मचाऱ्यांचा पाठलाग

दोघंही पोलीस कर्मचाऱ्यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

गाडी सोडून चोरटे पसार..

अशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले .या गाडीत जाड दोरखंड , लोखंडी अवजारे असून एटीएम गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत .मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे,किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

(thieves attempt break atm failed pachora police chase)