esakal | चोर तर चोर..वरतून शिरजोर ! काळा बाजार करणाऱ्यांनी पोलिसांनाच केली मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

चोर तर चोर..वरून शिरजोर ! काळा बाजार करणाऱ्यांनी पोलिसांनाच केली मारहाण

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा : स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचा तांदूळ काळा बाजारासाठी नेताना पिंगाणे (ता. शहादा) गावालगत शनिवारी (ता. १) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास पोलिसांनी वाहन थांबवून संबंधित व्यक्तीस विचारपूस केली असता, त्या व्यक्तीने गैरमार्गाने पाच ते सहा व्यक्तींना बोलून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे चालकासह सात व्यक्तींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा शहादा पोलिसांत दाखल झाला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना बी- बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करा !

घटनेत पोलिस प्रशासनाने रेशनिंगचा एक हजार ५४६ किलो तांदूळ सुमारे सात हजार ७३० रुपये व दोन वाहने असा एकूण नऊ लाख सात हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस प्रशासनाच्या या कारवाईने काळा बाजारात विक्री करणाऱ्या रेशनिंगच्या व्यवसायामध्ये धाबे दणाणले आहे. ही कारवाई शहाद्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

हेही वाचा: रेल्वेने ऐनवेळी निर्णय बदल्ला..आणि केळी कापणी ठप्प !

रात्री पासून पोलिसांचा बंदोबस्त..

पोलिसांना खबरीकडून पाडळदा (ता. शहादा) परिसरातून एका स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगचा तांदूळ हा तळोदाकडे जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे व पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी शनिवारी मध्यरात्रीपासूनच पाडळदा ते भादा रस्त्यावर पिंगाणे गावालगत बंदोबस्त तैनात केला होता. त्यानुसार पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास पिंगाणे पुलावरून आयशर वाहन (एमएच ३९, डब्ल्यू ०१९४) येताना गस्तीवरील पोलिसांना आढळले.

हेही वाचा: गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान

आणि पोलिसांनाच मारहाण..

पोलिसांनी वाहन थांबवून विचारपूस केली असता, वाहनातील चालकाच्या बाजूस बसलेल्या युवकाने पोलिसांशी हुज्जत घातली. वाहन सोडले नाही म्हणून त्या युवकाने तळोदा तालुक्यातून काही गैरकायद्याची पाच ते सात लोकांना बोलवून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करून त्यांच्या हाताला दुखापत केली. गैरमार्गाने तांदूळ घेऊन जाणाऱ्या व्यक्ती पोलिसांनाच दमबाजी करून तांदूळ नेण्याच्या प्रयत्न करीत असल्याने पोलिसांनी तत्काळ पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्याशी संपर्क साधून अधिक कुमक बोलवत पाच ते सात व्यक्तींना अटक केली. आरोपींची कार (एमएच ३९, डी. २१२२) जप्त केली. यासंदर्भात शहादा पोलिसांत पोलिस कर्मचारी भरत उगले (वय ३०) यांनी फिर्याद नोंदवून दीपक कलाल (रा. गणपती गल्ली तळोदा), योगेश पाटील (वय २४, रा. तळोदा) अशोक वाडीले व सुनील वाडीले (दोघे रा. जुनी पोस्ट गल्ली शहादा), धानका दलपूर, जगन सोनवणे, प्रवीण दलपूर या सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image