
पारोळा : कोरोनाच्या संकटात आता सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. त्यात येथील किसान महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप औजेकर यांनी अभिनव उपक्रम राबविला आहे.
त्यांनी वेगवेगळ्या गुगल क्लासरूम तयार करून त्यात विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी बारकोड पद्धतीचा प्रयोग केला आहे. विद्यार्थ्यांनी बारकोड स्कॅन केले, की ते आपोआप गुगल क्लासरूमवर जोडले जातात. या गुगल क्लासरूमवर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
आवश्य वाचा ः संवेदनशील जिल्हाधिकारी राऊतांमूळे पत्रकाराचे वाचले प्राण, अन पुण्याची पुनरावृत्ती टळली !
येथील महाविद्यालयाचे संस्थापक (स्व.) आमदार आप्पासाहेब भास्करराव पाटील यांच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी (स्व.) आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून प्राध्यापकांनी अभिवादन केले. या वेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. टी. गव्हाळे, आप्पासाहेब स्मृती समितीप्रमुख डॉ. माणिक बागले, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी वरिष्ठ महाविद्यालयातील मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विभागामार्फत गुगल क्लासरूम बारकोडचे प्रकाशन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.