धक्कादायक घटना: वीस वर्षीय तरुणीवर सामुहीक अत्याचार, मग विष पाजून ठार मारले !

संजय पाटील
Tuesday, 10 November 2020

पिडीत तरुणी लहान राम मंदिर परिसरात लाल बाग मैदानावर खेळणाऱ्या काही तरुणांना दिसली. त्यांनी तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले तिच्यावर प्राथमिक उपचारासाठी धुळे येथे नेतांना गाडीत शुद्धीवर आली आणी घटना सांगितली.

पारोळा :  टोळी ता,पारोळा येथील रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणीवर 3 तरुणांनी अत्याचार करत विष पाजून खून केल्याचा आरोप मयत तरुणीच्या नातेवाईंकांनी तसेच मामाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पारोळ्यात खळबळ माजली असून नातेवाईं व समाजीक संघटनेने सदर घटनेची सी आय डी चौकशी ची मागणी केली आहे. तर दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा-  ‘कोरोना’पासून कोसो दूर असेही एक गाव ! 

या बाबत वीस वर्षीय पिडीता ही वाय.एस.वाय. बी. एस सी चे शिक्षण पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात घेत होती. तिच्या वडीलांचे निधन झाले असून ती आपली आई दोन बहीण, दोन भाऊ यांच्यासोबत टोळी येथे राहत होती. 7 रोजी ती आपले मामा सुरेश पाटोळे यांच्या कडे पारोळा येथे दिवाळी साठी आली होती. कामानिमित्त मामा सकाळी घरा बाहेर गेले व गेल्यावर बाहेर औषधी आणण्यासाठी जाते असे सांगून गेली असता ती परत न आलीच नाही. मामाने शोध घेतला असता पारोळा पोलिसात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. 

मंदिरारावर बेशुद्ध अवस्थेत

ही तरुणी ही बेशुद्ध अवस्थेत शहरातील लहान राम मंदिर परिसरात लाल बाग मैदानावर खेळणाऱ्या काही तरुणांना दिसली. त्यांनी तिला कुटीर रुग्णालयात दाखल केले तिच्यावर प्राथमिक उपचारासाठी धुळे येथे नेतांना गाडीत शुद्धीवर आल्यावर तिने घटना नातेवाईंकांना सांगितली. धुळे येथे आज पिडीतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

 

गुंगीचे औषध देवून अत्याचार

पिडीताने घटना सांगत टोळी येथील शिवनंदन शालीक पवार, शिवनंदन शालीक पवार ,पप्पू अशोक पाटील,अशोक वालजी पाटील यांनी संगनमताने अपहरण करत सामूहिक अत्याचार केला असे फिर्यादी नमुद आहे. मृत पिडीताचा शविविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्याने मृत पिडीताला विष पाजल्याचे अढळून आल्याने खळबळ आज उडाली. 

 

नातेवाईक, समाज संघटना पोलिस ठाण्यात 

पिडीताचे मृतदेह नातेवाई व समाजीक संघटनेनांनी पारोळा येथे आज आणत पारोपाळा पोलिस ठाण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राकेश जाधव आरोपींना ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तर नातवाईंकांनी याप्रकरणी  सी आय डी चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

आवश्य वाचा- उपमहापौर पदासाठी भाजपचे सुनिल खडकेंचा एकमेव अर्ज ; बीनवीरोध निवड निश्चीत !
 

मुख्य आरोपीने आत्महत्येचा केला प्रयत्न

पोलीस चक्र फिरू लागल्या नंतर आरोपींच्या मार्गावर पोलीस असल्याचे समजताच मुख्य आरोपी शिवनंदन याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यास पारोळा येथून धुळे येथे उपचारासाठी नेले आहे.

पोलीस स्टेशन ला यात्रेचे स्वरूप 
सदर घटनेचे वृत्त जिल्ह्यात पसरल्या नंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पारोळा पोलीस स्टेशन ला भेट देऊन एकच गर्दी केल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मारहाण करणाऱ्या महिलेचे गूढ कायम -पीडित तरुणीने मृत्यू पूर्व दिलेल्या जबाणीत आपल्या मामा व आईस दिलेल्या माहितीत 3 पुरुष आरोपी सह एका महिलेचा उल्लेख केला होता परंतु तिचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून एकूण 4 आरोपी पैकी 2  संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी एक पुरुष व एक महिला आरोपीचे गूढ मात्र कायम आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola twenty year-old girl was tortured to death in parola