केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार सवलतीच्या दरात अन्नधान्य

धान्य वितरण करण्याचे शासनस्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत
Ration card
Ration cardRation card
Updated on: 



जळगाव ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा (National Food Security) तसेच शेतकरी योजनेंतर्गत (Farmers Schemes) एप्रिल- मेत स्वस्त धान्याचा लाभ मिळालेला नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना (Ration card) देखील आगामी जून महिन्यात सवलतीच्या दरात गहू व तांदूळ प्रत्येकी १ किलो प्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

(orange ration card holders get foodgrains discounted rates)

Ration card
महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध


गेल्या वर्षी कोरोना संकट काळात केंद्र व राज्य शासन निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा तसेच शेतकरी योजनेंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील लाभ देण्यात आला आहे. परंतु जिल्हा स्तरावरून वितरित करण्यात आलेले धान्य व वाटप केलेले धान्य यात तफावत असून अन्नधान्य शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार या योजनेतर्गत समाविष्ठ न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती गहू ८ रूपये व तांदूळ १२ रूपये प्रतिकिलो असे दोन किलो धान्य वितरण करण्याचे शासनस्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत.

Ration card
दैव बलवत्तर म्हणूनच ‘तौक्ते’ चक्रीवादळातून सुखरूप परतलो !

जिल्ह्यात ज्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे प्रत्यक्ष वाटप करताना आकडेवारीत तफावत असले आणि प्रत्यक्ष शिल्लक आकडेवारीनुसार असलेले धान्य आहे, त्याच दुकानातून ते वितरीत करण्यात यावे, खराब स्थितीतील अन्नधान्याचे वितरण होणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही याची चौकशी नोंदवहीच्या आधारे करण्यासह किमान ५ जणांच्या घरी भेट द्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
(orange ration card holders get foodgrains discounted rates)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com