Jalgaon : विवाहिता मुलीसह बेपत्ता

Disappeared married women & daughter
Disappeared married women & daughteresakal
Updated on

यावल (जि. जळगाव) : शहरातील ३३ वर्षीय विवाहित महिला (Married Women) आपल्या सहा वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. विवाहित महिला मुलीसह गेल्या सोमवारी (ता.२) जळगाव येथे जाण्यासाठी येथून निघाली होती. मात्र ती तिकडे पोहोचली नाही. सर्वत्र शोध घेऊन आढळून न आल्यामुळे येथील पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. (married women Disappeared with daughter)

Disappeared married women & daughter
Nashik : राज ठाकरेंनी पोलिसांना लावले नमाजला !

शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरावरील पुजारी त्रिभुवनदास लक्ष्मण बैरागी यांच्या पत्नी ज्योती त्रिभुवनदास बैरागी व मुलगी त्रिशिका बैरागी (वय ६) हे दोघे सोमवारी (ता.२) यावल येथून जळगाव येथे जाण्यासाठी दुपारी साडेबाराला बसस्थानकावर (Bus Stand) आल्या. मात्र सायंकाळ झाली तरी त्या जळगाव येथे नातेवाईकांकडे पोहोचल्या नाहीत. तेव्हा दोघांचा सर्वत्र शोध घेऊन देखील त्या कुठेच आढळून न आल्याने बुधवारी (ता.४) येथील पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एसटी वाहकाकडे चौकशी केली असता बेपत्ता झालेली विवाहिता शेगाव जाण्यासाठी कसे जावे लागेल, या संदर्भात माहिती विचारात असल्याचे वाहकाने सांगितले. फौजदार नितीन चव्हाण तपास करीत आहेत.

Disappeared married women & daughter
Nashik : पाण्याच्या मागणीत वाढ; मनपाकडून 10 टँकरची सोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com