
Jalgaon News : मांस विक्री करणाऱ्यास अटक
Jalgaon News : मांस विक्री करणाऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. (MIDC Police Crime Squad arrested suspect who was selling meat jalgaon news)
मुक्तार जमाल शेख असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून मांस कापण्याचा सुरा, कुऱ्हाड व मांसाचे तुकडे व हाडे जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगरातील एका सुज्ञ नागरिकाने संशयित मुक्तार जमाल हा मांस विक्री करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिली.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
त्यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, रवींद्र चौधरी, विजय कोळी आदींनी संशयिताला साहित्यासह अटक केली. याबाबत पोलिस नाईक राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.