Miss Heritage International: मिस हेरिटेज इंटरनॅशनलसाठी जळगावच्या गायत्री ठाकूरची निवड

Miss Heritage International Selection of Gayatri Thakur from  Jalgaon news
Miss Heritage International Selection of Gayatri Thakur from Jalgaon news

Miss Heritage International : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या ‘हेरिटेज' आणि संस्कृतीमुळे नेहमीच विशेष ठरतो.

भारताची हीच अनोखी ओळख जपत जळगावची गायत्री ठाकूर २०२२ ची ‘मिस हेरिटेज इंडिया’ ठरल्यानंतर यंदा थायलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस हेरिटेज इंटरनॅशनल २०२३’ साठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. (Miss Heritage International Selection of Gayatri Thakur from Jalgaon news)

मूळची जळगावची गायत्री ही नृत्यांगना, मॉडेल, थिएटर आर्टिस्ट आणि मुंबई विद्यापीठाची लोककला पदवीधर व जळगावच्या एम. जे. महाविद्यालयाची लोकनृत्य पदवीधर आहे. तसेच बऱ्याचशा ब्रँड्ससाठी गायत्रीने मॉडेलिंग केले आहे. ‘गायु ठाकूर' म्हणून ‘रिल्स'च्या माध्यमातून प्रसिद्ध आहे. महाविद्यालयात असल्यापासूनच ती लावणी या लोकनृत्याचं सादरीकरण आणि त्याचा जागर करत आहे.

‘ब्युटी विथ ब्रेन’ या संकल्पनेवर आधारित ‘मिस हेरिटेज' हा अनोखा ‘ब्युटी पेजंट' आहे. त्यात ‘ब्युटी विथ ब्रेन' सोबत ‘हेरिटेज'ला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

Miss Heritage International Selection of Gayatri Thakur from  Jalgaon news
Beauty Tips : Latte Coffee तर प्यायलेच असाल, पण Latte Makeup केलाय का? जाणून घ्या टिप्स

हा अनोखा ‘ब्युटी पेजंट' दरवर्षी मृणाल गायकवाड यांच्या मृणाल एंटरटेन्मेंटकडून आयोजित करण्यात येतो.

राष्ट्रीयस्तरावरील शो पुणे येथे गेल्यावर्षी आयोजित केला होता. त्यात गायत्रीने सहभाग नोंदवला होता. ‘ऑडिशन', ‘ग्रुमिंग' अशा विविध स्पर्धात्मक फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून ‘मिस हेरिटेज इंडिया २०२२' हा ‘विनिंग टायटल' आणि ‘मिस फोटोजेनिक हेरिटेज २०२२' हे ‘सबटायटल' पटकावून गायत्री विजयी मानकरी ठरली.

Miss Heritage International Selection of Gayatri Thakur from  Jalgaon news
Rekha Beauty Secret : इन आँखो की मस्ती के! ७० री गाठली तरी रेखाजी तिशीच्याच वाटतात, कसं काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com