Jalgaon News : ‘मोदी घरकुल आवास’ योजनेचे होणार लाँचिंग; पंतप्रधानांचा 12 फेब्रुवारीस दौरा शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ फेब्रुवारीस जळगावमध्ये जाहीर सभेस येण्याची दाट शक्यता आहे.
pm modi
pm modiesakal

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ फेब्रुवारीस जळगावमध्ये जाहीर सभेस येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पोलिस, महसूल विभागाच्या बैठका होत आहेत. मोदी या दौऱ्यात ‘मोदी घरकुल आवास योजना’ लाँचिंग करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोदींची सभा कुसुंबा येथील विमानतळासमोरील इंडस्ट्रीयल पार्कमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आली आहे. (Modi Gharkul Awas scheme will be launched jalgaon news)

या ठिकाणी केंद्र व राज्याच्या विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांना सभेच्या ठिकाणी बोलविण्याचे नियोजन आहे. सोबतच्या लाभार्थ्यांच्या निवास, भोजन, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भव्य मंडप, विजेची सोय, सार्वजनिक शौचालये उभारली जाणार आहेत.

त्यादृष्टीने लागणारा खर्च किती अपेक्षित आहे, त्यासाठी टेंडर मागविण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. या खर्चाचा अंदाज घेत निधीची मागणी ग्रामविकास मंत्रालयाकडे करावयाची आहे.

जिल्ह्यातील संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित बोलविण्यासाठी तयारीला लागा. त्याठिकाणी लाभार्थ्यांची निवास, भोजनाची सोय करावी, असे पत्र ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वरील सर्व सुविधा पुरविण्यासाठी टेंडर प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बसचे आरक्षण

कोणत्या लाभार्थ्यांना बोलावयाचे, त्यांची संख्या किती, त्यांना जळगावला आणण्यासाठी किती बस लागतील, त्याचा किती खर्च येईल याची माहिती काढण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली आहे.

pm modi
PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ

पोलिस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी, पोलिस, होमगार्ड यांच्या नियुक्तीबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनात नियोजन सुरू आहे. पोलिस, महसूल अधिकारी यांच्या नियुक्ताही करण्यात येत आहेत.

काही लाभार्थ्यांशी बोलण्याची संधी

विविध योजनांचे लाभार्थी पंतप्रधान मोदींच्या सभेला येतील. त्यापैकी काही लाभार्थ्यांना मोदींसमोर बोलण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांना बोलण्याची संधी द्यावी याबाबत संबंधित योजनांचे प्रमुख माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करीत आहेत.

भाजपत होणार मोठे ‘इनकमिंग’

मोदींच्या सभेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यासह खानदेशात काही राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी नुकताच कन्या डॉ. केतकी यांच्यासह भाजपत प्रवेश केला.

त्याच वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मोदींच्या सभेआधी जिल्ह्यात आणखी काही नेते भाजपत प्रवेश घेतील, असे बोलले जात आहे.

pm modi
Jalgaon News : पोलिस दलातील 15 प्रभारींच्या बदल्या; बाहेरील जिल्ह्यातील अधिकारी हजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com