
विद्यापीठात मोटारसायकल चोरी; चक्क प्राध्यापकाचीच दुचाकी केली गायब
जळगाव : शहरात मोटारसायकल चोरट्यांवर (Motorcycle Theif) नियंत्रण मिळवण्यात पोलिस दल पुर्णतः अयशस्वी ठरले आहे. शहरातील बाजारपेठांसह सर्वच शासकिय कार्यालयातून (Government Offices) वाहन चोरीच्या घटना समोर येत असतांना आता चक्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून (North Maharashtra University) एका प्राध्यापकाची दुचाकी चोरुन नेण्याचा विक्रम या चोरट्यांनी केला आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Motorcycle thief stole professors bike at North Maharashtra university Jalgaon Crime News)
शहरातील व्यंकटेश नगरातील रहिवासी तथा पत्रकार डॉ. गोपी सोरडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. त्यांच्याकडे (एमएच १९ एयू २५००) क्रमांकाची दुचाकी असून. ते (ता.३० रोजी) ग. स. सोसायटी निवडणुकीच्या मतमोजणीचे वृत्तांकनासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेले होते. त्यांनी आपली दुचाकी विद्यापीठातील सोशल सायन्स विभागाच्या (Social Science Department) पार्कींगमध्ये लावली होती. वृत्तांकनासाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लांबविली. त्यांनी दुचाकीचा संपुर्ण विद्यापीठाच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात तक्रार दिली. त्यांच्यातक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय चौधरी हे करीत आहेत.
हेही वाचा: जळगाव : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ
दिवसाला ५ वाहने लंपास
जळगाव शहरात विवीध व्यापारी संकुले, अपार्टमेंटच्या पार्कींग्जसह इतर सार्वजनीक ठिकाणांहुन दिवस भरातून साधारण पाच वाहने लंपास होत असल्याच्या घटना रेाज घडत आहेत. वाहन चोरट्यांनी अक्षरश: रान माजवले असुन दुचाकी वापरण्यापेक्षा सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.
हेही वाचा: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; एकाला अटक
Web Title: Motorcycle Thief Stole Professors Bike At North Maharashtra University Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..