चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला मारहाण करत लोखंडी पाते असलेल्या कोळपणीच्या साहाय्याने डाव्या कानावर गंभीर दुखापत केली.
Crime Latest Marathi News
Crime Latest Marathi Newsesakal
Updated on: 

चोपडा : तालुक्यातील गोरगावले शिवारात राहत असलेल्या लिलाबाई बारेला हिच्या चारित्र्यावर संशय घेत पती ग्यानसिंग बारेला याने लिलाबाई हिला मारहाण करत लोखंडी पाते असलेल्या कोळपणीच्या साहाय्याने डाव्या कानावर गंभीर दुखापत केली. यात लिलाबाईचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २७) रात्री नऊच्या सुमारास तालुक्यातील कठोरा शिवारातील डॉ संजय पाटील यांच्या शेतातील झोपडीत घडली. (Latest Marathi News)

Crime Latest Marathi News
पण नेमका श्रावण सुरु झाला.. प्रसाद ओकची पोस्ट भलतीच चर्चेत

ग्यानसिंग बारेला (मूळ रा. सोनखेडी, ता. वरला, जि. बडवाणी) हा गोरगावले शिवारात कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याने बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पत्नी लिलाबाई हिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली. यातील फिर्यादी टेंम्ब्या मन्साराम बारेला व पत्नी लिलाबाई यांच्यातील चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी पाते असलेल्या शेत कोळपणीच्या साह्याने लिलाबाईच्या कानावर वार करीत तिला गंभीर जखमी केले. यातून तिचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी टेम्ब्या बारेला याच्या फिर्यादीवरून ग्यानसिंग बारेला याच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime Latest Marathi News
पावसामुळे कोसळली घराची भिंत; ७ मुले ढिगाऱ्याखाली दबली, दोघांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com