पण नेमका श्रावण सुरु झाला.. प्रसाद ओकची पोस्ट भलतीच चर्चेत

अभिनेता प्रसाद ओकचं पार्टी प्रकरण आता जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. यावर प्रसादने भन्नाट पोस्ट लिहिली आहे.
prasad oak shared instagram post about party celebration with maharashtrachi hasyajatra team
prasad oak shared instagram post about party celebration with maharashtrachi hasyajatra team sakal

prasad oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (prasad oak) सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. या दोन्ही चित्रपटांचं सर्वत्र कौतुक सुरू आहे. कारण हे चित्रपट आता पुरस्कारावर मोहर उमटवत आहेत. या चित्रपटांना नुकताच फक्त मराठी सिने सन्मान प्राप्त झाला. दोन्ही चित्रपटांनी भरगोस पुरस्कार मिळवले. आता त्या बदल्यात पार्टी द्यावी लागलेच म्हणून प्रसाद ओकने एक भन्नाट पोस्ट लिहिली आहे.

गेल्या काही वर्षात सोनी मराठी sony marathi वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवलं. या कार्यक्रमाणे विनोदाची आणि यशाची मोठी उंची गाठली आहे. या कार्यक्रमात प्रसाद ओक परीक्षकपदी आहे. त्यामुळे प्रसादचे चित्रपट हीट झाले की सर्व कलाकार हास्यरथी त्याला पार्टी मागत असतात. पण आजवर त्याने काही पार्टी दिलेली नाही, असा विनोद वारंवार समीर चौगुले, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि सर्वच मंडळी करत असतात. प्रसाद पार्टी द्यायला तयार आहे, पण पार्टी दिली तर विनोद करता येणार नाही, त्यामुळे आम्हाला पार्टी नको असे मध्यंतरी हास्यरथी म्हणाले होते. त्यामुळे प्रसाद ओक आणि पार्टी हे प्रकरण उभ्या महाराष्ट्राला ठाऊक झाले आहे. म्हणूनच पुरस्कारानंतर प्रसादने एक मस्त पोस्ट लिहिली आहे.

'पार्टी देणार' असं लिहिलेलं एक टी-शर्ट घालून प्रसादने एक फोटो शेयर केला आहे. सोबतच एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, 'चंद्रमुखी" आणि "धर्मवीर" दोन्ही चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय... सो आता "ते सगळे" PARTY साठी मागे लागणारच आहेत... मी आजच देणार होतो पार्टी... पण नेमका श्रावण सुरु झाला.. आता पार्टी ठरेपर्यंत हा T-SHIRT "हास्यजत्रा" टीम ला समर्पित'.. '' अशी मिश्किल पोस्ट त्याने लिहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com