सोमवारी शहरात पाणीपुरवठा बंद

water supply
water supply esakal

जळगाव : वाघूर पंपिंग स्टेशनच्या वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. १३) शहरात पाणीपुरवठा होणार नाही.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशन येथे पाणी पुरवठा करणाऱ्या ३३ केव्हीच्या उच्चदाब वीज वाहिनीवर पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम तसेच झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वीज मंडळातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे वाघूर पंपिंग स्टेशन बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १३) रोजी शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहून तो मंगळवारी (ता. १४) करण्यात येईल.

water supply
Jalgaon : पालिकांच्या अंतिम प्रभागरचनेला मंजुरी; आरक्षण सोडत जाहीर होणार

पिंप्राळा गावठाण उर्वरीत भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसर भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर, तांबापुरा, शामा फायर, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा, भगवाननगर, कोल्हेनगर, अबिंका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, मेहरूण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, सदगुरूनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल परिसर आदी ठिकाणी मंगळवारी पाणीपुरवठा होइल.

water supply
Jalgaon : महामार्गावर खडीचे साम्रज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com