Jalgaon :...तर जुलैअखेर कोरोनाची चौथी लाट

Corona News Updates
Corona News Updatesesakal

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Corona Patients) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (ता. २६) तब्बल तेरा रूग्ण वाढले आहेत. तर ५९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Isolation) आहेत. एकूण ७० रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. यामुळे चौथी लाट येते की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबई परिसरात कोरोना रूग्ण वाढीचा दर अधिक आहे. असे असले तरी जिल्ह्यातही कोरोनाबाधित आढळून येत असल्याने भीती वाढू लागली आहे. (number of corona patients is increasing fourth wave coming Jalgaon corona update news)

एकट्या जळगाव शहरात सहा, यावलला पाच, भुसावळला सहा अशी रुग्ण संख्या आढळली आहे. पूर्वी दोन तीन रूग्ण दररोजबाधित आढळत असत. आता तर ८ ते १० रुग्ण दररोज येत आहे. असेच सुरू राहिले तर जुलैच्या अखेरच्या आठवड्यात कोरोनाची चौथी लाट येण्यास वेळ लागणार नसल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. आता जर पुन्हा कोरोनाची लाट आली तर शाळा बंद, दैनंदिन व्यवहार बंद करणे शासनाला भाग पडणार आहे. यामुळे नागरिकांनी आतापासूनच कोरोनाबाबत सावध भूमिका घेत नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या साथीपासून सर्वच जणांचा बचाव होवू शकणार आहे.

लक्षणांचा क्रम बदलला
पूर्वीच्या लाटेत अगोदर चव जाणे, घसा खवखवणे, ताप येणे अशी लक्षणे होती. आता चौथ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांनी क्रम बदलला आहे. आता अगोदर ताप येणे, डोळे दुखणे, नंतर घसा खवखवणे, तोंडाची चव जाणे अशी लक्षणे आहेत. नागरिकांनी अशी लक्षण दिसताच कोरोनाची चाचणी करणे गरजचे असल्याचे सांगण्यात आले.

Corona News Updates
Nashik : पॅरोलवरील ‘नॉट रिचेबल’ कैद्यांविरोधात गुन्हे

"आतापर्यंत रोज दोन-तीन रुग्णांना कोरोनाची बाधा होत होती. आता मात्र आठ ते दहा रूग्ण रोज आढळून येताहेत. हे असेच सुरू झाले तर जुलैअखेर दररोज १०० ते १५० रूग्ण बाधित होतील. ती चौथी लाट असेल. नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे थांबविले पाहिजे." - डॉ. किशोर इंगोले, प्रभारी अधिष्ठाता ‘जीएमसी’ जळगाव.

Corona News Updates
Nashik : बंडखोर आमदारांच्या निवास, कार्यालयांबाहेर पोलीस बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com