esakal | होय..आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी बंडखोरी केली! 
sakal

बोलून बातमी शोधा

होय..आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी बंडखोरी केली! 

कामे घेवून माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जायचो. मात्र आम्हाला केवळ आश्‍वासने मिळायची कामे होत नसे.

होय..आम्ही जळगाव शहराच्या विकासासाठी बंडखोरी केली! 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः शहरातील आमच्या प्रभागातील विकास कामे ठप्प झाली होती. अडीच वर्षाच्या काळात रस्त्यांसह इतर विकास कामे झालेली नाही. आगामी अडीच वर्षात भाजपमध्ये राहिलो तर होणार नाही. यामुळे आम्ही नऊ जणांनी एकत्र येत, भाजपमधून बाहेर पडून शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकास कामांसाठी घेतला. कोणत्याही प्रकारचा घोडे बाजार झालेला नाही, अशा पतिक्रिया भाजप मधून अगोदर बाहेर पडलेल्या (बंडखोर) नऊ नगरसेवकांनी आज व्यक्त केल्या. 

आवश्य वाचा- फडणवीस अन्‌ महाजनांचा कित्‍ता सेम; पण उसन्या अवसानाचा फुगा फुटलाच
 

दरम्यान आज उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी महापालिकेत येवून पदभार स्वीकारला आहे.काल (ता.१८) महापौर, उपमहापौर निवडीवेळी श्री.पाटील मुंबईत होते. ऑनलाईन मतदान त्यांनी केले होते. आज ते मुंबईवरून आल्यानंतर महापालिकेत पदभार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी श्री.पाटील यांचा सत्कार केला. माजी उपमहापौर सुनिल खडके, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पती सुधीर पाटील, नगरसेविका पती कूंदन काळे हे भाजप बंडखोरी केलेल यावेळी उपस्थित होते. गजानन मालपूरे, सुनिल माळी, लाडवंजारी आदी यावेळी उपस्थित होते. 

महाजन केवळ आश्वासन द्यायचे

ते म्हणाले, की आम्ही कामे घेवून माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जायचो. मात्र आम्हाला केवळ आश्‍वासने मिळायची कामे होत नसे. जी कामे झाले ती ठरावीक नगरसेवकांच्या वार्डात झाली.मग आपल्या वार्डाचे काय. मतदारांना काय उत्तरे द्यावयाची, अडीच वर्षानी कोणेते मूद्दे घेवून लोकांसमोर जावयाचे. यामुळे बंडखोरी करून शिवसेनेला पाठींबा द्यायचा. यामुळे राज्यातून विकास कामांसाठी निधीही येईल. विकास कामेही होतील. या चांगल्या कामासाठी आमची बंडखोरी आहे. 
 

आवर्जून वाचा- गावातील कुटुंबे अचानक झाले गर्भश्रीमंत; म्‍हणे खोदकाम करताना सापडले सोने
 
महापौर कार्यालय असणार १७ मजल्यावर 
महापौर कार्यालय सध्या दुसऱ्या मजल्या होते. आता महापालिकेत सत्तांतर झाल्याने महापौर कार्यालय सतराव्या मजल्यावर हलविण्यात येत आहे. आज दुसऱ्या मजल्यावरील महापौर कार्यालयातील सामान सतराव्या मजल्यावर हलविण्यात आले. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image