Jalgaon News : सणासुदीच्या तोंडावर भाववाढ; जिऱ्यासह मसाल्याचे भाव वधारले

Indian Spices
Indian Spicesesakal

Jalgaon News : उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने मागील सहा महिन्यातच भाजीत वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. दोनशे रुपये किलो असलेले जिरे सातशे रुपये झाले आहे.

जिऱ्यासह मसाल्याचे इतरही पदार्थांचे भाव वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही भाववाढ झाल्याने गृहिणींचे मसाले पदार्थांबाबतचे गणित कोलमडले आहे. फोडणीतून जिरे गायब होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला हा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

बासुंदी व इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरला जाणारा हिरवा वेलदोड्याने २ हजार ८०० रुपये किलोचा मोठा पल्ला गाठला आहे. (Prices of spices including cumin increased jalgaon news)

त्यामुळे वेलदोडे वापरावर नियंत्रण आणावे लागणार आहे. याशिवाय लोणच्यासह दररोज जेवणानंतर खाण्यासाठी वापरऱ्या जाणाऱ्या बडीशोपचे भाव दुप्पट झाले आहेत. १६० रुपये किलो असलेली बडीशोप ३२० रुपये दराने विकली जात आहे. राजस्थान व गुजरातमध्ये यावर्षी जिरेच्या पिकाला पोषक वातावरण न मिळाल्यामुळे उत्पादनात घट झाल्याचे कारण घाऊक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

या भाववाढीमुळे मसाल्याच्या पदार्थांची विक्री करणारे दुकानदार महागडे जिरे घ्यायला मागे पुढे पाहत आहेत. शहरात मसाल्याच्या पदार्थांची विक्री करणारे प्रमुख सात ते आठ दुकाने आहेत. काही पदार्थांच्या भाववाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

धने, मेथीची मोठ्या प्रमाणात विक्री

बहुतांश शेतकरी आपल्या शेतात धने व मेथीचे पीक घेतात. शहरातील मसाले दुकानातून धने व मेथीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले. धने १०० ते १२० व मेथी ७५ ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. याशिवाय मसल्यातील जिरे व वेलदोडे वगळता इतर पदार्थांच्या किमतीत पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Indian Spices
Jalgaon News : जळगावातील कचऱ्यावर होणार आता गॅस निर्मिती; बीपीसीएल कंपनीचा प्रस्ताव

मसाल्याच्या पदार्थांचे आताचे व पूर्वीचे भाव (कंसात)

धने आता १२० पूर्वी ९०
दगडी फुल-आता ६५० पूर्वी ६००
दालचिनी -आता ६०० पूर्वी ५००
मिरे आता -७५० पूर्वी ६००
लवंग आता- ११०० पूर्वी ८००
कर्णफुल -आता ७०० पूर्वी ९००
शहाजीरा -आता ५८० पूर्वी ४५०
मसाला विलायची आता-११०० पूर्वी ८००
हिरवी विलायची- आता २८०० पूर्वी २०००
त्रिफळा-आता ५०० पूर्वी ४५०

नाकेशर- आता ८०० पूर्वी १७००
रामपत्री -आता त१३०० पूर्वी ११००
जाय पत्री- आता २२०० पूर्वी २५००
खसखस- आता १५०० पूर्वी १४००
तेज पत्ता- आता १०० पूर्वी ९०
जिरे -आता ७०० पूर्वी २५०
सुंठ -आता ४५० पूर्वी ३५०
कांडी हळद- आता २१० पूर्वी १३०
खोबरे- आता १२५ पूर्वी १४०
सदर भाव प्रति किलो प्रमाणे आहेत.

Indian Spices
Jalgaon News : ‘थॅलेसेमिया’वर लोकेश पाटीलने केली मात; नवोदय परीक्षेत यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com