Jalgaon News | पायाभूत सोयी-सुविधांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी अमन मित्तल

Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officer
Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officeresakal

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विकासकामे करताना पायाभूत सोयी-सुविधांच्या बळकटीकरणाबरोबरच वीज, आरोग्य, शिक्षण, दळण-वळणाच्या सुविधांना प्राधान्य द्यावे. ज्या विभागांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यांनी तांत्रिक मान्यता घेऊन प्रस्ताव सादर करावेत. (Prioritize infrastructure Collector Aman Mittal say in District Planning Committee meeting Jalgaon News)

Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officer
Nashik News: आयुक्त म्हणतात, भिऊ नका मी तुमच्या पाठीशी! विभागप्रमुखांना वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना

प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या कामांची वर्कऑर्डर देऊन कामे सुरू करावीत. मागील वर्षातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाही, याचीही सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन मित्तल यांनी मंगळवारी (ता. ३१) येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officer
Jalgaon Crime News : खरे पोलिस गायब, तोतया पोलिसांनी घेतला Charge

जळगावचे उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की शासकीय यंत्रणांनी विहित कालावधीत विकासकामे पूर्ण होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. नवीन कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होतील, याचेही नियोजन करावे.

उपलब्ध निधीचे व्यवस्थित नियोजन करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करावयाच्या विविध विकासकामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावे.

Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officer
Nashik NMC News : सवलत शुल्क न भरल्याने बांधकामे स्थगितीच्या सूचना

या वेळी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण, आदिवासी घटक कार्यक्रम, विशेष घटक योजना आदींचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी पाटील म्हणाले, की प्रशासकीय मान्यता घेऊन सुरू झालेल्या कामांसाठी त्या विभागांनी निधीची मागणी करावी.

ज्या विभागांचा निधी विहित कालावधीत खर्च होणार नाही, त्यांनी निधी परत करावा, जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र शासकीय यंत्रणांनी तातडीने सादर करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपले प्रस्ताव पाठविताना आय-पास संगणक प्रणालीचा वापर करावा.

Jalgaon: Collector Aman Mittal while giving instructions in the review meeting of District Planning Committee. Neighbor Officer
Jalgaon Crime News : बलात्काराच्या गुन्ह्यात फरार संशयित अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com