वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणाऱ्यांवर धाड

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली.
Raid on illegal use of Gas cylinder
Raid on illegal use of Gas cylinderesakal

जळगाव : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकली. त्याच्याकडून गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील औरंगाबाद नाक्यावरील मयूरी ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरर कंपनीच्या गेटसमोर शोएब शेख शफिक शेख (वय १९, रा. फातेमानगर) हा तरुण नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल. अशा पद्धतीने घरगुती वापरण्याच्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरत होता. याचवेळी एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० हजारांचे गॅस सिलिंडर व ११ हजार ५०० रुपयांचे स्प्रींकलर मशिन असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून शोएब शेख शफीक शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raid on illegal use of Gas cylinder
पाणी भरण्यावरून वाद; एकाचा मृत्यू, तीन जखमी
Raid on illegal use of Gas cylinder
अमळनेर तालुक्यात वादळासह पाऊस, गारपीट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com