Latest Marathi News | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ramdas Athawale

Ramdas Athawale Statement : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही!

जळगाव : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने काम करीत आहे. ते कोसळण्याबाबत अनेक जण भाकीत करीत असले तरी ते होणार नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.(ramdas athawale statement about Shinde Fadnavis government jalgaon latest news)

दुसऱ्या टप्प्यात ‘रिपाइं’ला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पक्ष सर्व जातिधर्मांसाठी व्यापक करण्यास आम्ही आतापर्यंत अपयशी ठरल्याची खंत व्यक्त करून यासाठी आम्ही आता जोमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोल होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा सोमवारी (ता. ३) भुसावळ येथे होत आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी श्री. आठवले जळगाव जिल्ह्यात आले होते. जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली.

हेही वाचा: Jalgaon Water Shortage : पाणीयोजनेचे पावणेदोन कोटी ‘कोरड्या विहिरीत’

या वेळी आमदार सुरेश भोळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, कार्याध्यक्ष बाबूराव कापसे, चंद्रकांत सोनकांबळे, दिनेश कांबळे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, आयुब शेख, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल आदी उपस्थित होते.

धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळावे

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर आहे, ते कोणत्याही स्थितीत कोसळणार नाही. थोड्याफार प्रमाणात नाराजी असते, ती दूर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्षचिन्हावरून वाद सुरू आहे.

मात्र आज शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार आहेत, खासदारही त्यांच्याकडे अधिक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: Jalgaon News : Police Helplineवरील थट्टा पडली महागात!

गांधींना ‘भारत जोडो’चा फायदा नाही

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत बोलताना आठवले म्हणाले, की काँसला बळ देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असली तरी पक्षाला त्याचा फारसा फायदा होणार नाही. देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम नेते आहेत.

खडसेंचे भाजपत स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की खडसे आमचे चांगले मित्र आहेत. ते जर भाजपमध्ये पुन्हा आले तर त्यांचे स्वागतच आहे.

जी.एस. मैदान सभांसाठी द्यावे

शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीचे जी.एस. मैदान पक्षाच्या राजकीय सभांसाठी देणे बंद करण्यात आलेले आहे. याबाबत आठवले म्हणाले, की राजकीय पक्षासाठी सभेचे मैदान देणे बंद केल्यामुळे आम्हाला ‘रिपाइं’चा मेळावा भुसावळ येथे घ्यावा लागला. त्यामुळे हे मैदान पक्षाच्या मेळाव्यासाठी न देण्याचा केलेला ठराव जिल्हा परिषदेने रद्द करावा..

हेही वाचा: Jalgaon Crime News : दशरथ नगरातील तरुणाचा गळा चिरून खून