Jalgaon Crime News : दशरथ नगरातील तरुणाचा गळा चिरून खून

सौरभ चौधरी
सौरभ चौधरी esakal

जळगाव : भादली-कानसवाडा (ता. जळगाव) रस्त्यावरील पाटचारीवर ३२ वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला आहे. गळा चिरून क्रूरपणे खून करण्यात आला असून, सौरभ यशवंत चौधरी (रा. दशरथनगर, काऊ कोल्हे शाळेजवळ) असे मृताचे नाव आहे. व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणासह कौटुंबिक कलहाच्या दिशेने संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.(youth murdered by cutting throat at Dashrath Nagar jalgaon crime news)

सौरभ चौधरी
Jalgaon : रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचा सहभाग

भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील शेळगाव पाटचारीवर तरुणाचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. भादलीच्या पोलिसपाटील राधिका ढाके यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी वरिष्ठांना कल्पना दिली.

अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधीकारी सोमनाथ वाकचौरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, अलियार खान, शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, गणेश गायकवाड आदींसह पोलिसांचा फौजफाटा साडेदहाला घटनास्थळी दाखल झाला. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्‍हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला.

सौरभ चौधरी
Jalgaon News : Police Helplineवरील थट्टा पडली महागात!

मोबाईलवरून पटली ओळख

पोलिसांनी मृताच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार सौरभची वयोवृद्ध आई, बहीण व मामा यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटविली. कुटुंबीयांना धीर दिल्यानंतर या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीमंताचा लेक झाला कर्जबाजारी

सौरभ आई-वडिलांना एकुलता होता. त्याला एक बहीण असून, तिचे लग्न झाले आहे. सधन, उच्चशिक्षित कुटुंबातील असल्याने पालकांनी त्याचे सर्वच लाड पुरविले. औरंगाबादच्या एमआयडी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण सौरभने घेतले होते.

त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१५ ला त्याचा प्रेमविवाह झाला असून, त्याला चार वर्षांचे एक मूलदेखील आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो वाईट मित्रांच्या संगतीला लागल्याने काही वर्षांतच कर्जात बुडाला. त्याच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून वडील यशवंत चौधरी यांनी नऊ महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली, तर पत्नीनेही घटस्फोट घेतल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली.

सौरभ चौधरी
Jalgaon Water Shortage : पाणीयोजनेचे पावणेदोन कोटी ‘कोरड्या विहिरीत’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com