Farmers who participated in the march with bullock carts.
Farmers who participated in the march with bullock carts.esakal

Farmer Protest Jalgaon : शेतकरी संकटात असताना सुलतान प्रचारात मग्न : संजय सावंत

Farmer Protest Jalgaon : राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यामध्ये निवडणुकांचे सत्र सुरू आहे.

अशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निवडणुकांच्या प्रचारात मग्न असून, राज्याच्या परिस्थितीकडे, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याची टीका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली आहे. (Sanjay Sawant statement of Sultan engaged in campaigning while farmers were in trouble jalgaon news)

धरणगाव येथील बैलगाडी मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. संजय सावंत म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधावर बसून रडत आहे.

नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात आत्महत्याचे विचार येत आहेत. जळगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, भडगाव भागांत शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे? सरकार जागेवर आहे का? असा सवाल सावंत यांनी केला.

आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्गदर्शनाने शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहोत, असे सावंत म्हणाले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शेतकरी राब राब राबतो. परंतु त्याचा मेहनतीला फळ मिळत नाही. शेतमालाला हमीभाव नाही. पीकविम्याचे पैसे मिळत नाही.

अतिवृष्टीचे अनुदान नाही. फक्त घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेणारे पालकमंत्री गप्प का? कुठे गेला तुमचा शिंगाडा ? तीन मंत्री असून शेतकरी वाऱ्यावर सोडले. ज्या दिवशी माझ्या शेतकरी राजा रस्त्यावर उतरले तेव्हा नाकीनऊ येईल, अशी तंबी वाघ यांनी दिली.

Farmers who participated in the march with bullock carts.
Nashik Farmers Protest : सदोष निवाड्याविरोधात चक्का जामचा इशारा; सुरत-चेन्नई बाधितांचे मोर्चातून शक्तिप्रदर्शन

बैलगाडी मोर्चात गुलाबराव वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपजिल्हा प्रमुख ॲड. शरद माळी, संघटक राजेंद्र ठाकरे, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी संघटना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी सभापती दीपक सोनवणे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

या वेळी तहसीलदार सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. संतोष सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. विनोद रोकडे यांनी आभार मानले.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भागळे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी हा मैदानात उतरला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकारी पक्षाचे आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असे ते म्हणाले.

शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी अतिवृष्टी अनुदान, पीकविमा याविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी शेतकऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या. माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

Farmers who participated in the march with bullock carts.
Farmer Protest: कर्ज वसुलीविरोधात नागपुरात अन्नत्याग आंदोलन; शेतकरी संघटना समन्वय समितीचा आक्रमक पवित्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com