Women and villagers participating in the march.
Women and villagers participating in the march. esakal

Jalgaon News : भडगावात बालिका हत्येच्या निषेधार्थ मूकमोर्चा; हजारोंच्या संख्येने ‘तहसील’वर धडक

Jalgaon News : गोंडगाव (ता. भडगाव) येथील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रावारी (ता. ४) तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. नगर परिषदेपासून निघालेल्या मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील महिला व पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी युवतींनी तहसीलदार मुकेश हिवाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. आमदार किशोर पाटील यांनी मुंबईला स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भ्रमणध्वनीवरून पीडितेच्या आई-वडिलांचे बोलणे करून दिले. (Silent march to protest the murder of girl child in Bhadgaon jalgaon news)

गोंडगाव येथील बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराला नगर परिषदेपासून मोर्चा निघाला. मेन रोडने मोर्चा निघून तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. त्यानंतर तहसीलदार मुकेश हिवाळे यांना विद्यार्थिनींनी निवेदन दिले.

मारेकऱ्याला फाशी द्या

या वेळी मोर्चेकऱ्यांनी आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशी देण्याची मागणी केली.

याशिवाय माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या वैशाली सूर्यवंशी, पाचोऱ्याच्या माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, पाचोरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, सामाजिक कार्यकर्त्या संजिदा शेख, क्षत्रिय मराठा समाजाचे समन्वयक सोमनाथ मराठे यांनी भाषणात घटनेचा निषेध करून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहराला छावणीचे स्वरूप

गुरुवारी (ता. ३) संशयित आरोपीला गोंडगाव येथे घेऊन गेल्यावर पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केला होता. त्यात पोलिसही जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहराला आज छावणीचे स्वरूप आले होते. मोर्चा शांततेत निघाला.

मोर्चाचा समारोप झाल्यावर सहभागी नागरिक शांततेने घरी निघाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, निरीक्षक राहुल खताळ हे स्वत: बंदोबस्तावर नजर ठेवून होते.

मुख्यमंत्र्यांचा पीडितेच्या आई-वडिलांशी संवाद

आमदार किशोर पाटील यांनी गुरुवारी (ता. ३) विधानसभेत गोंडगाव घटनेबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यावर युवा नेते सुमीत पाटील यांच्या भ्रमणध्वनीवरून मुख्यमंत्र्यांनी पीडित बालिकेच्या आई-वडिलांशी संवाद साधला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women and villagers participating in the march.
Bhusawal Railway Station : 6 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट! विकासकामांचे मोदींच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांनी वडिलांना सांगितले, की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, तर खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात येईल. खटल्यासाठी आवश्यक तो सर्व खर्च शासन करेल. शासन पूर्णपणे आपल्या मागे उभे राहील, याची ग्वाही दिली.

पीडितेच्या आईने संशयित आरोपीला पकडले आहे, तर लगेच फाशी द्या किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या, असे सांगितले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, की संशयित आरोपीवर आवश्यक ती कठोर कलमे लावण्यात आली आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

Women and villagers participating in the march.
Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यासाठी पावणेचार कोटींचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com