Jalgaon News : गिरणा पात्रातून 6 ट्रॅक्टर ताब्यात; अचानक कारवाईने वाळूमाफिया भयभीत

Illegal sand transportation news
Illegal sand transportation newsesakal

जळगाव : गिरणा नदीपात्रातून बांभोरी ते जळगाव, तसेच सावखेडा शिवारातून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. (Six tractors seized from mill vessel sudden action scared sand mafia Jalgaon News)

Illegal sand transportation news
Jalgaon News : तारखेडा येथे गोदामातून 26 लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी ते जळगावदरम्यान पोद्दार शाळेवर विनाक्रमाकांच्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) दुपारी कारवाई केली. या कारवाईत एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी पोना हरिश शिंपी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी कारवाई महामार्गावर हॉटेल साई पॅलेससमोर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली असून, विनाक्रमाकांच्या ट्रॅक्टवरवरील अज्ञात चालकाविरोधात पोलिस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तिसऱ्या कारवाई महामार्गावरील हॉटेल मराठासमोर एक ट्रॅक्टर पकडले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Illegal sand transportation news
Jalgaon Robbery News : जळगावात मध्यरात्री सशस्त्र धाडसी दरोडा; रोकड, दागिन्यांसह दुचाकी चोरीस

वाळूसह विनाक्रमाकांची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली असून, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खोटेनगर स्टॉपजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विनाक्रमाकांचे ट्रॅक्टर पकडे असून, तालुका पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सावखेडा शिवारातून वाळूचे दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. ट्रॅक्टरचालक विशाल नरेंद्र पवार (वय २१, रा. सावखेडा बु., ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal sand transportation news
Jalgaon News : फुले मार्केट दमदाटी प्रकरण; कथित ‘दादां’ ची मार्केटमधून धिंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com