Jalgaon Accident News : भरधाव ट्रॅक्टरने तरुणास चिरडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental Death

Jalgaon Accident News : भरधाव ट्रॅक्टरने तरुणास चिरडले

वरणगाव : येथून जवळच असलेल्या तपत कठोरे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ राज्य मार्गाने २६ वर्षीय पादचारी तरुणाला भरधाव ट्रक्टरने चिरडले.

ही घटना रविवारी (ता. ८) घडली. तपत कठोरा गावातील वरणगाव- हतनूर राज्य मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ निंभोरा येथील २६ वर्षीय इक्बाल शहा अब्दुल शहा फकीर चालत जात असताना, त्याला ट्रॅक्टर (एमएच २८, एझेड ४९२६) चालक बाळकृष्ण गिरधर चौधरी याने चिरडले. (Speeding tractor crushed young man Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon Crime News : New Yearची दुकानफोडी चोरट्याला पचलीच नाही

इक्बाल खाली पडला. त्याच्या पोटावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. तो जखमी अवस्थेत असताना, सुदैवाने त्याचवेळेस त्याचा चुलत भाऊ लतीफ शहा मुसा शाह फकीर तेथून दुचाकीने जात होता. त्याने ट्रॅक्टरचालकाच्या मदतीने इक्बाल यास ओमनी गाडीमध्ये टाकून वरणगाव येथील खासगी रुग्णालयात आणले.

तेथे डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले. वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. याबाबत लतीफ शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा: Nashik News: बसगाड्या धावतात फलकाविना! बस कोठून कोठे जाणार हे कळून येत नसल्याने प्रवाशांची अडचण