Marathi Movie : मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटात खानदेशातील युवकाची संघर्षकथा!

Producer Prakash Baviskar while giving information about the movie 'Marathi Paul Padte pudhe'. Neighbor actor Chirag Patil, actress Siddhi Patne.
Producer Prakash Baviskar while giving information about the movie 'Marathi Paul Padte pudhe'. Neighbor actor Chirag Patil, actress Siddhi Patne.esakal
Updated on

Jalgaon News : खानदेशात शेतकरी कुटुंबात जन्मलेला युवक मुंबईत व्यावसायिक बनण्यासाठी अन्यायाशी दोन हात करतो, त्याची संघर्षकथा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात आहे. (struggle story of youth of Khandesh in movie Marathi Paul Padte pudhe jalgaon news)

५ मेस संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात तो झळकणार आहे. या चित्रपटाचा निव्वळ नफा समाजसेवेसाठी दान करण्यात येणार असल्याची माहिती निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव येथील रॉयल पॅलेस येथे चित्रपटाबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी चित्रपटातील अभिनेते चिराग पाटील, अभिनेत्री सिद्धी पाटणे उपस्थित होत्या. निर्माता प्रकाश बाविस्कर हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी आहेत. याबाबत माहिती देताना प्रकाश बाविस्कर यांनी सांगितले, की लेखक दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Producer Prakash Baviskar while giving information about the movie 'Marathi Paul Padte pudhe'. Neighbor actor Chirag Patil, actress Siddhi Patne.
Marathi Sahitya Sammelan : अमळनेरात तब्बल 72 वर्षांनी भरणार साहित्याचा मेळा!

शिव हा खानदेशात राहणारा शेतकरी कुटुंबातील युवक मुंबईत नोकरी स्वीकारतो, त्या वेळी त्याला अमराठी माणूस मराठी माणसांची पिळवणूक करतात, मराठी माणूस हा व्यवसाय करीत नाही केवळ नोकरीवर समाधान मानतो, तो सरकारी नोकरीवर तुळशीपत्र ठेवून व्यवसायात उतरतो, यात त्याला अमराठी व्यावसायिकाविरुद्ध संघर्ष करावा लागतो. या संघर्षातून तो यशस्वी होता का? हेच या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. खानदेशतही या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून, अहिराणी गाणे चित्रपटात आहे.

चित्रपटात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पुत्र चिराग पाटील हे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहेत, तर सिद्धी पाटणे अभिनेत्री आहेत. अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुळकर्णी, प्रदीप कोथमिरे यांच्या भूमिका आहेत.

पार्श्वसंगीत समीर खोले यांचे आहे. या चित्रपटातून येणारा निव्वळ नफा हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासाठी, वृद्धाश्रमासाठी देण्यात येणार आहे.

Producer Prakash Baviskar while giving information about the movie 'Marathi Paul Padte pudhe'. Neighbor actor Chirag Patil, actress Siddhi Patne.
Jalgaon News : आधी बैठकीतील इतिवृत्तात ओके नंतरच होणार रस्ता; मनपा, बांधकाम विभागास सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com