Jalgaon Suicide Case : आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

Sucide Attempt
Sucide Attemptesakal

जळगाव : आजारपणाला कंटाळून अमरेंद्रसिंग रामप्रसादसिंग भदोरिया (वय ५६, रा. मोतीमहल अपार्टमेंट, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ) यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय परिसरातील मोतीमहल अपार्टमेंटमध्ये अमरेंद्रसिंग भदोरिया वास्तव्यास होते. अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने या आजारपणाला कंटाळून त्यांनी शनिवारी रात्री राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. (Sucide Case Old man commits suicide due to illness Jalgaon News)

Sucide Attempt
Narayan Rane vs Manisha kayande : राणेंच्या चाफ्याच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या कायंदेंनी दाखवला धतुरा

ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. भदोरिया मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

Sucide Attempt
Randeep Hooda: मांजरेकरांऐवजी रणदीप हुड्डाच करणार 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चं दिग्दर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com