Summer Heat Rise : अल निनोच्या प्रभावाने उन्हाळा राहणार अतिकडक; शासकीय यंत्रणांना सज्जतेचा इशारा

Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news
Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon newsesakal

जळगाव : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ (El Nino) या समुद्र प्रवणतेच्या सक्रियतेमुळे मान्सूनच्या पर्जन्यावरही परिणाम होणार आहे. (Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news)

उन्हाळा अतिकडक राहील, अवकाळी पाऊस केव्हाही येऊ शकतो, पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करा, जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आरक्षित करा, सर्वच रुग्णांलयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी (ता. २४ ) येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पाणीटंचाई, ‘अल निनो’चा प्रभावावर उपाययोजनांची बैठक झाली. तीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण आहे. त्या अनुषंगाने १ मार्च ते १५ जूनदरम्यान आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणांमध्ये समन्वय राहावा. उन्हाळ्यातील उष्मलाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु-प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर विविध विभागांनी कार्यवाही करावी.

१३ व १४ फेब्रुवारीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी कार्यशाळा घेऊन उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news
Jalgaon News : महापालिकेतर्फे जागा घेतली, पण स्वच्छतागृह बंद..

...तर उष्णतेची लाट समजा

तापमानाच्या निकषांनुसार सलग दोन दिवस डोंगरी भागात ३० डिग्री सेल्सियस, समुद्र किनारपट्ट्यात ३७ डिग्री सेल्सियस व समतल भूभागात ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होणे किंवा या उक्त विभागात सलग दोन दिवस हंगामातील सामान्य तापमानापेक्षा ४.५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे, यापैकी कोणतीही एक नोंद आढळल्यास त्या भागात उष्णतेची लाट आहे, असे समजून उपाययोजना कराव्यात.

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलाने उष्मतेत वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे उष्णतेची लाट निर्माण होत असते. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

अशा करा उपाययोजना

नागरिकांच्या सहाय्यासाठी अथवा मदतीसाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत १०७७, २०७०, १००, १०१, १०२, १०४, १०८, ११२ हे संपर्क क्रमांक प्रसारित केले आहेत. लघु कृती आराखडा संबंधित विभागाकडून तयार करून घ्यावा.

झोपडपट्टी, कारखाने, व्यवसाय, वीटभट्टी व तत्सम व्यवसायांमध्ये काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणे, धार्मिकस्थळे व सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक वैद्यकीय सुविधा आहेत किंवा नाहीत, याची खात्री करावी.

Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news
SET Exam : पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा उद्या; परीक्षेचे प्रवेशपत्र येथून करा Download

आरोग्यविषयक बाबींसाठी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून काम करतील व ते जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहून प्रत्येक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुटीर रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्याच्या सोयीसुविधा पूर्ण वेळ उपलब्ध राहतील, याची खात्री करतील.

उष्णतेच्या लाटेसंदर्भात पूर्वसूचना व अंदाज भारतीय हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येतात. जिल्हा प्रादेशिक अधिकारी अथवा जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी रोज आयएमडीकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना अवगत करतील.

हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना येताच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेसनोट स्थानिक दूरचित्रवाणी, वाहिन्या, रेडिओ, सोशल मीडिया, ध्वनिक्षेपक आदींच्या माध्यमातून नागरिकांना सूचना व इशारा देण्यात येईल.

स्वतंत्र कक्ष, रजिस्टर तयार करा

१ मार्चपासून सर्व शासकीय रुग्णालयात उष्माघातामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवावे. त्यात उष्माघातामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची व उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तीची सविस्तर नोंद करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा. उष्माघातामुळे कोणत्याही व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास वरील निकष तपासून मृत्यूचे कारण अचूक नोंद करावी.

Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news
Market Committee Election : भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांची उद्या बैठक; युतीबाबत निर्णय?

गेल्या काही वर्षांतील तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

२०१८--३५.६

२०१९--४४.२

२०२०--३४.५

२०२१-४५.९

२०२२--४६

२०२२ मध्ये केलेल्या उपाययोजना

खाटांची संख्या--७७०

कोल्ड बेड संख्या--१५४

एकूण--९२४

उष्माघाताची लक्षणे

*चक्कर येणे, उलटी व मळमळ होणे

*शरीराचे तापमान खूप वाढणे

*पोटात कळा येणे

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हे करा

*तहान लागली नसली, तरी पाणी प्या

*सूती कपडे घाला

*प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा

*उन्हात काम करणे टाळा

Summer heat will be rising due to El Nino effect jalgaon news
Jalgaon News : पालिकेची वसुलीची धडक मोहीम; पाचोऱ्यात सतरा गाळे सील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com