Suspect run for 5 years in robbery arrested jalgaon crime news
Suspect run for 5 years in robbery arrested jalgaon crime newsesakal

Jalgaon Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यात 5 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

Jalgaon Crime News : महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे-उल्हासनगर, पालघरसह उर्वरित महाराष्ट्रात मोठे दरोडे टाकण्यात तरबेज सराईत दरोडेखोरावर जळगाव पोलिसांनी झडप घातली.

प्रथमेश ऊर्फ डॉन प्रकाश ठमके (वय २४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून, तो तब्बल पाच वर्षांपासून विविध जिल्ह्यांतील पोलिसांना गुंगारा देत होता. (Suspect run for 5 years in robbery arrested jalgaon crime news)

जळगावात वर्सी महोत्सवात तो आला अन्‌ एमआयडीसी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. प्रथमेश ऊर्फ डॉन याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून लाखोंचा ऐवज लुटला असून, दरोडा टाकून तो फरारी व्हायचा. पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते.

प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे तो जळगावातील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवानिमित्त आला असल्याची गुप्त माहिती ‘एमआयडीसी’ पोलिसांना मिळाली होती.

Suspect run for 5 years in robbery arrested jalgaon crime news
Jalgaon Crime News : सोशल मीडियातून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासह निरीक्षक जयपाल हिरे यांनी नियोजनबद्धरीत्या संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचून पथकाला सूचना दिल्या. उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रूपाली महाजन, विशेष शाखेचे सहायक निरीक्षक दिनेश बडगुजर, अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी वर्सी महोत्सवात पोचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने गर्दीचा फायदा घेत धूम ठोकली.

पोलिसांचा पाठलाग

पोलिसांना पाहताच प्रथमेश गर्दीतून निसटला. पळत जाऊन तो लवकरच कुठल्यातरी वाहनात बसून फरारी होण्याच्या बेतात होता. मात्र, त्याच्या मागावर त्या वेळी वरील पथकाने त्याचा अडीच किलोमीटर पाठलाग करून अटक केली. त्याला ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्या स्वाधीन करण्यात आले. पथक त्याला घेऊन ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहे.

Suspect run for 5 years in robbery arrested jalgaon crime news
Jalgaon Crime News : यावलला 3 घरफोड्या संशयित आरोपीस अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com