Jalgaon Crime News : बॅटऱ्या विकून संशयितांची मौज मजा!

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : बाई-बाटलीच्या नशेसाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांच्या टोळीला नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. भादली सरपंचाच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेल्यावर काही तासांतच तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सलग तीन दिवस चौकशी केल्यावर या टोळीने असोदा येथे चार, तर भादली येथून तीन शेतकऱ्यांच्या बॅटऱ्या चोरून नेल्याची कबुली दिली असून, तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Suspects have fun by selling batteries Four in Asia and three in Bhadli stolen from farmers Jalgaon News)

Crime News
Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

भादली येथील शेतकरी तथा सरपंच मिलिंद चौधरी यांना भादली शिवारातील शेतात उभ्या ट्रॅक्टरची (एमएच १९, सीएस ८४५९) बॅटरी चोरून नेल्याचे आढळले. मिलिंद चौधरी यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसांना संपर्क केला.

पोलिस व ग्रामस्थांनी सापळा रचून कैलास सपकाळे (वय २६), सुनील चौधरी (३०) आणि राहुल शेळके (२२, तिघे रा. ढंढोरेनगर, तरसोद) यांना पकडले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, तपासाधिकारी अलियार खान यांनी चोरट्यांकडून सात हजारांची नवी कोरी बॅटरी जप्त केली. पोलिस कोठडीत यथेच्छ प्रसादानंतर त्यांनी इतर गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात असोदा गावातील चार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची बॅटऱ्या चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Crime News
Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

भादली येथील शेतकरी देविदास माधव कोल्हे (वय ३९) यांच्या नशिराबाद रोडवरील शेतात गुरांच्या गोठ्यात उभे असलेल्या ट्रॅक्टरची (एमएच १९, डीव्ही 3९८७) बॅटरी लंपास केली. भादलीतीलच अशोक माधव नारखेडे (वय ४०) यांच्या कडगाव रस्त्यालगत खंडेराव मंदिराजवळील खळ्यात उभे ट्रॅक्टरची (एमएच १९, सी ९७१६) बॅटरी चोरून नेली.

नंतर शेतकरी सचिन मधुकर माळी (३३) यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेली, असे तीन गुन्हे नव्याने दाखल झाले असून, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार मोठ्या बॅटऱ्या, तर नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन बॅटऱ्या याच टोळीने लंपास केल्याचे आता उघडकीस आले आहे.निम्मेत बॅटरी विकुन मौज-मजा

Crime News
Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

नशिराबाद पेालिसांच्या अटकेतील टोळीचा म्होरक्या कैलास सपकाळे हा दिवसभर असोदा, भादली, ममुराबाद, विदगाव अशा शेत शिवारांमध्ये खळ्यात कोणाचे ट्रॅक्टर उभे आहे. त्यात नवी कोरी बॅटरी आहे.

याची माहिती संकलीत करुन उचानक रात्रीतून ट्रिपसीट दुचाकीवर येवुन बॅटर्या चोरत होते. नवी बॅटरी ट्रक चालकांना निम्मे किंमतीत तर, थोडी वापरलेली जुनी बॅटरी भंगारात मोडून मिळेल त्या पैशांवर यथेच्छ दारु ढोसत वेश्यागमन करण्याचा तिघांना नाद लागला होता. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्या पथकाने व्यक्त केली आहे.

Crime News
Nashik News: जिल्हा बॅंकेने मागविली थकबाकीदारांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com