Tehsildar Protest: तहसीलदार संप झाल्यास शासनाची लाइफ लाईन’ बंद; संघटनेचा आक्रमक पवित्रा

Officials of Tehsildar Association giving a statement to Collector Ayush Prasad regarding the work stoppage.
Officials of Tehsildar Association giving a statement to Collector Ayush Prasad regarding the work stoppage.

Tehsildar Protest : तहसीलदार नायब तहसीलदार यांनी बेमुदत कामबंद संप करण्याचा इशारा दिल्याने शासनाची लाइफ लाईन बंद होण्याच्या मार्गावर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन अर्थ मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदेशानंतरही मुख्य अप्पर सचिव (महसूल) यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याने येत्या १ डिसेंबरपासून ते संपावर जाणार आहेत. (Tehsildar Naib Tehsildar warned of indefinite strike jalgaon news)

राज्यातील ३६ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत काम बंद आंदोलन करून संपावर जात असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

याबाबत तहसीलदार (महसूल) पंकज लोखंडे, नायब तहसीलदार रूपाली काळे, नायब तहसीलदार निवडणूक सुनील समदाणे, नायब तहसीलदार राहुल वाघ, एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर, प्रदीप झांबरे, प्राजक्ता केदार आदी उपस्थित होते.

याआधीही आंदोलन

३ मार्च २०२३ रोजी राज्यभरातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारला होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करत स्वाक्षरी करून राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

Officials of Tehsildar Association giving a statement to Collector Ayush Prasad regarding the work stoppage.
Jalgaon Unseasonal Rain: जिल्ह्यात 24 तासांत 31.8 मिलिमीटर पाऊस; गारपिटीने मोठे नुकसान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुरी केलेल्या प्रस्तावाला आता अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून केराची टोपली दाखवत असल्याचे तहसीलदार संघटना कडून सांगण्यात आले आहे.

.. तर नववर्षात नागरिक वेठीस

नववर्षाच्या स्वागताला अशा प्रकारच्या संपामुळे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी ताटकळत राहावे लागणार आहे. त्यामुळे हा संप कधी मागे घेतला जाईल मुख्य अप्पर सचिव हा प्रस्ताव कधी पूर्ण करतील हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खरे पाहता महसूल विभाग हाच राज्य सरकारचा कणा आहे, सर्वच विभागांना महसूल विभाग यांची गरज असते, तहसीलदार हे तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी असतात. क़ायदा सुव्यवस्था ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. राज्यातील तिजोरीत त्यांच्याच मार्फत जास्त लक्ष्मी येते. त्यामुळे महसूल विभाग हा राज्याचा कणा आहे, त्यामुळे राज्य सरकारची लाइफ लाईन’ बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Officials of Tehsildar Association giving a statement to Collector Ayush Prasad regarding the work stoppage.
Unmesh Patil : प्रकल्प प्रलंबित ठेवून मलिदा खाणारे जनतेला माहिती : खासदार उन्मेष पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com