Latest Marathi News | खासगी भूखंडातून गौण खनिजाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varangaon: Minor minerals stolen from private plots

Jalgaon News : खासगी भूखंडातून गौण खनिजाची चोरी

वरणगाव : परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गौण खनिजाची रात्रदिवस चोरटी वाहतूक सुरू आहे. मात्र येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांचे सोईस्कर दुर्लक्ष होताना समोर आले आहे.

वरणगाव परिसरातील सिद्धेश्वरनगरातील चंद्रकला दिलीप चौधरी या महिलेच्या खासगी बिनशेती भूखंडातून २० ते २५ लाख रुपयांचे अज्ञात व्यावसायिकांनी गौण खनिज चोरी करून नेल्याची भूखंडमालक चंद्रकला चौधरी यांनी भसावळ तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.

सिद्धेश्वरनगर विल्हाळे शिवारात गट क्रमांक ५८५ मध्ये १ हेक्टर ७० आर बिनशेती मुरमाड भूखंड असून, गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणातून रात्री बारानंतर गौण खनिजाची चोरी होत आहे. (Theft of minor minerals from private parts Jalgaon News)

हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

वरणगावसह परिसरात सरकारी व खासगी बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्या बांधकामांच्या भरावासाठी गौण खनिजाची गरज भासत असल्याने कंत्राटदार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या व्याववसायिकांसोबत संगनमत करून विनापरवानगी व विना परमीट गौण खनिज वाहतूक करून आणले जात आहे.

ही व्यवस्था गेल्या कित्तेक वर्षांपासून सुरू असताना येथील सर्कल अधिकारी व तलाठी यांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. येथील चंद्रकला चौधरी यांच्या खासगी भूखंडातून अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे गौण खनिज व्यावसायिकांनी चोरून नेल्याने त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Mumbai News : ऐन हिवाळ्यात मुंबईत 'पूर'; घरं, रस्ते पाण्याखाली, सामानही वाहून गेलं

या ठिकाणी २८ डिसेंबरला महिला गेली असता गौण खनिजाचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी मोठमोठ्या टेकड्या असून चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून गौण खनिज माफियांनी चोरी करून नेला असून, या माफियांकडे तलाठी, सर्कल व तहसीलदारांनी कानाडोळा केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बायपासकडील नवीन महामार्गालगत सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी भरावासाठी या गौण खनिजाचा वापर करण्यात येत असल्याचा संशय निवेदनात व्यक्त केला आहे. संबंधित यंत्रणेने याबाबत त्वरित चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, वरणगाव पोलिस ठाणे आदींना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Dhule News : भरवस्तीतील अवैध गॅसपंपावर छापा

टॅग्स :JalgaonLands