लक्झरीकार मधुन घरफोडीसाठी फिरणारे अटकेत

thief arrested
thief arrestedesakal

जळगाव : चोरीच्या उद्देशाने शहरात फिरत असलेल्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार व चोरीचे साहित्य मिळून आले असून पोलिसांनी दोघांना अटक करुन कारसह साहित्य जप्त केले आहे. (thief Arrested for burglary in a luxury car Jalgaon Crime News)

thief arrested
नाशिक : ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर आग

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना अरविंद ऊर्फ आरु वाघोदे (वय २५, रा. सुप्रीम कॉलनी) व अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा. अयोध्यानगर) दोघ संशयित संशयास्पदरित्या फिरताना दिसले. पथकाने त्यांना थांबविले असता त्या दोघांनी या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघंही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तसेच त्याच्यावर आतापर्यंत सुमारे १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर अनिल चौधरी याने मुक्ताईनगरात झालेल्या घरफोडीत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे

thief arrested
Summer Update : मालेगाव तापले; उष्माघाताने अनोळखी वृध्दाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com