Jalgaon Crime News : बंद घरात चोरट्यांची आखाजी; रोकडसह दागिने लंपास

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves stole gold ornaments and cash worth 1 lakh rupees from house Jalgaon Crime News)

रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे बद्रिनाथ जवाहरलाल चौधरी (वय ४९) अनुराग स्टेट बँक कॉलनीत कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. अक्षयतृतीयेच्या निमित्ताने बद्रिनाथ चौधरी शनिवारी (ता. २२) बाहेरगावी गेले होते.

त्या वेळी घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील गोदरेज कपाटातून सोन्याचे दागिने व बारा हजार रुपयांची रोकड, असा एकूण एक लाख ३२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Jalgaon Crime News : बोदवडला दोन गटात राडा, 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चौधरी कुटुंबीय रविवार(ता. २३) घरी परतल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौधरी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.

crime news
Jalgaon Crime News : जुन्या वादातून नशिराबाद-कंडारीत राडा; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com