Jalgaon Crime News : निकाह न केल्यास ॲसिड टाकण्याची मुलीला धमकी; पालकांमध्ये खळबळ

Jalgaon Crime News : निकाह न केल्यास ॲसिड टाकण्याची मुलीला धमकी; पालकांमध्ये खळबळ
Updated on

Jalgaon Crime News : अल्पवयीन शाळकरी मुलीला निकाह करण्याची मागणी करणाऱ्या तरुणावर पहूर पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाने शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Threatening girl to throw acid if she says no to marriage jalgaon crime news)

याबाबत पीडितेने पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातीलच संशयित हुसेन शहा नासीर शहा याने २८ सप्टेंबर २०२३ ला दुपारी एक ते १० ऑक्टोबर २०२३ ला सकाळी साडेदहाच्या दरम्यान वेळोवेळी पहूर पेठ येथील आठवडे बाजार परिसरात माझा पाठलाग करीत शिवीगाळ करून ‘तू माझ्याशी निकाह करशील का? तू बाजारात भेटत जा, तू जर नाही भेटली तर तुझ्या तोंडावर अॅसिड टाकेन, तू जर माझी नाही झालीस तर दुसऱ्याची होऊ देणार नाही,’ अशी धमकी दिली.

Jalgaon Crime News : निकाह न केल्यास ॲसिड टाकण्याची मुलीला धमकी; पालकांमध्ये खळबळ
Jalgaon Crime News : यावलला क्षुल्लक कारणावरून एकाचा खून; दुसरा गंभीर जखमी

या प्रकरणी पीडिता अल्पवयीन शाळकरी मुलीच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित हुसेन शहा नासीर शहा (रा. पहूर पेठ, ता. जामनेर) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मात्र अद्याप फरारी आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गर्जे तपास करीत आहेत.

Jalgaon Crime News : निकाह न केल्यास ॲसिड टाकण्याची मुलीला धमकी; पालकांमध्ये खळबळ
Jalgaon Fraud Crime: बनावट दस्तावेजाद्वारे मिळविले ‘नॉन क्रिमीलेअर’; भुसावळच्या सेतू केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com