
Jalgaon Crime News : जळगाव- पाचोरा रोडवरील वावडदा-बिलवाडी येथे शेतासह खळ्याची रखवालदारी करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदाराची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करून ट्रॅक्टर चोरुन नेले होते.
बुधवारी (ता.१५) पहाटे खुनाची घटना उघडकीस आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हा दाखल होवुन २४ तास उलटत नाही तोवर स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांना मध्यप्रदेशातून मुसक्या आवळत अटक केली आहे.
वावडदा (ता जळगाव) येथील ईश्वर मन्साराम पाटील यांच्या शेतशिवारात पांडुरंग पंडित पाटील (वय-५२, रा.बिलवाडी) रखवालदारी करत होते. मंगळवारी (ता.१४) मध्यरात्रीच्या सुमारास पांडुरंग पाटील नेहमीप्रमाणे शेताची आणि खळ्याची कामे अटोपून खळ्यात आराम करत होते. (Unknown assailants killed security guard and stole tractor jalgaon crime news)
त्यांना कोणीतरी आल्याची चाहूल लागताच त्यांनी चाचपणी करत असतानाच त्यांच्या डोक्यात अज्ञात हल्लेखोरांनी ट्रॅक्टरचे लोखंडी डाबर टाकून हत्या केली होती. शहरापासून अवघ्या २०-२५ किलोमीटर अंतरावर घडलेल्या या गंभीर गुन्ह्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या.
संशयितांचा शोध सुरु
जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात जळगाव भाग डिवायएसपी ऋषिकेश रावले, स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि बिलवाडी, वावडदा गावकऱ्यांना केलेली विचारपूस याच्या आधारावर अभ्यास करून संशयितांचा शोध सुरु केला होता.
सालदारावर संशय बळावला
निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी या पथकाने घटनास्थळी मिळालेले पुरावे गोपनीय माहिती, शेतमालक राजेंद्र पाटील यांच्याकडून संकलित माहितीवरून त्यांचा सालदार पवन बहाधीर बारेला याच्यावर संशय बळावला.
सालदार पवन हा मालकास न सांगताच अचानक त्याच्या सासरवाडीला निघून गेल्याने पोलिस पथकाने त्यांचा शोध सुरु केला. त्याची सासरवाडी सालीकला (सालीतांडा, ता.राजापूर, जि. बडवाणी म.प्र.) गाव गाठून शोध घेतल्यावर पवन बारेला व त्याचा साथीदार मिळून आला. दोघांची विचारपूस केली असता दोघेही पोलिस पथकासमोर जास्तवेळ तग धरु शकले नाही. थंडीत घामाघूम झालेल्या दोघांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
शालक- मेहुण्याचा प्लॅन
पवन बहाधीर बारेला (वय-३०) हा ईश्वर पाटील यांच्या शेतात सालदारकी करत होता. पवन व त्याचा शालक बाधुरसिंग शोभाराम बारेला (वय-२४) अशांनी घटनेच्या एकदोन दिवस अगोदरच मालकाचे ट्रॅक्टर चोरुन नेण्याचा प्लॅन आखला होता. त्यानुसार मंगळवारच्या मध्यरात्री ट्रॅक्टर चोरुन नेण्यासाठी दोघे आले.
मात्र, रखवालदार पांडुरंग पाटील याने त्यांना ट्रॅक्टर चोरुन नेण्यास विरोध केल्याने तिघांमध्ये झटापट होऊन ट्रॅक्टरचे वजनी डाबर वयोवृद्ध पांडुरंग पाटील यांच्या छातीत व डोक्यात मारल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यानंतर दोघांनी ट्रॅक्टर पळवून नेले. मात्र, थोडे अंतर चालून झाल्यावर ट्रॅक्टरही बंद पडल्याने तसेच सोडून दोघांनी दुचाकीवरून पळ काढल्याची कबुली गुन्हेशाखेला दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.