Jalgaon Unseasonal Rain : भुसावळ, मेहुणबारेत अवकाळीचा फटका

Rainfall Alert
Rainfall Alertesakal

Jalgaon Unseasonal Rain : जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव तालुक्यांतील काही (Jalgaon News) भागांत शनिवारी (ता. १५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गहू, मका, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (unseasonal rain Bhusawal mehunbare Extensive damage to crops jalgaon news)

भुसावळ शहरासह तालुक्यात दिवसभर रखरखत्या उन्हाने तसेच सायंकाळी अचानक हवेने रूद्र रूप धारण केल्याने पावसाने तब्बल दोन तास चांगलाच धिंगाणा घातला. यामुळे नाले ओसंडून वाहत होते.

त्यात तीन ते चार तास विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. दिवसभर उन्हाच्या तडाख्याने आधीच नागरिक त्रास असताना त्यात जोरदार हवेमुळे वीज गायब झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Rainfall Alert
Gas Cylinder Rate Hike : सर्वसामान्य नागरिक ‘गॅस’वर; दरात वर्षभरात 22.5 टक्के दरवाढ!

मेहुणबारे परिसरात पाऊस

मेहुणबारेसह चाळीसगाव तालुक्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री आठ ते साडेआठदरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे गावात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, या वादळी पावसाने कांदा, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Rainfall Alert
Unseasonal Rain : डांग सौंदाणे येथे पुन्हा अतिवृष्टी अन् गारपीटीचा कहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com