Unseasonal Rain : अवकाळी पावसाचे 9 हजार हेक्टरवर नुकसान; 13 हजार शेतकरी नुकसानग्रस्त

Unseasonal Rain
Unseasonal Rainesakal

जळगाव : जिल्ह्यात ५ व ६ मार्चला जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यांत झाले आहे. (Unseasonal rain has damaged 9 thousand hectares 13 thousand farmers have suffered jalgaon news)

जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधीत असून, १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सूर्यफुल, कांदा, केळी, पपई, मोसंबी व लिंबूचा सामावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने बुधवारी (ता. ८) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना सादर केला.

गेल्या रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवस सूर्यदर्शनही अल्प वेळ झाले. या पावसाने काढणीवर आलेला गहू, बजारी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले.

सोमवारी होळी होती. यादिवशी चंद्राला ‘पुनवेचा चांद’ म्हणतात. मात्र, या दिवशी सायंकाळी जोरदार वादळ झाले. यामुळे चंद्रदर्शन झाले नाही. ‘पुनवेच्या चांद’चे दर्शन नागरिकांना झाले नाही.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Unseasonal Rain
Jalgaon Crime News : वांजोळा येथे दारुची हातभट्टी उद्‌ध्वस्त

झालेले नुकसान हेक्टरमध्ये

तालुका--हरभरा--बाजरी--गहू--मका--ज्वारी -एकूण

भडगाव--०--१७--२७--३००--९२--४४६

धरणगाव--०--३४--२१२--११८८--५९९--२०३३

एरंडोल--७८--३८--५६३--२९८३--५७५--४६२९

चोपडा--१३६--२८--१७९--७८४--१७७--१३०८

केळीचे ३२.८५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. यात बोदवड, भुसावळ, जळगाव या गावांचा सामावेश आहे.

"जिल्ह्यात ५ व ६मार्चला अवकाळी पावसाने सुमारे ९ हजारांवर हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले सुरू आहेत. लवकरच सर्व पंचनामे पूर्ण होतील." -संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Unseasonal Rain
State Kabaddi Competition : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरु होणार; यंदा आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com