Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; आवक वाढल्याने पातळीत 7 टक्क्यांनी वाढ

Girna Dam
Girna Damesakal

Jalgaon Girna Dam : जिल्ह्याला वरदान लाभलेल्या गिरणा धरण क्षेत्रात पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र पाच दिवसांत मालेगाव भागात झालेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात सात टक्क्यांनी वाढून हा जलसाठा आता २६ टक्क्यांवर गेला आहे.

पाण्याची अशीच आवक राहिल्यास आणखी तीन, चार दिवसांत तो ३० टक्क्यांवर जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. (water storage in girna dam has increased gone up to 26 percent jalgaon news)

गिरणा धरणात तीस टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्यास वर्षभराची पाण्याची चिंता मिटते, असा अनुमान आहे. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदा पाच दिवसांत साठ्यात वाढ झाली आहे.

राज्यात बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. चाळीसगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी अजून पाहिजे, तसा पाऊस झाला नाही. पावसाचे दोन महिने संपत आले तरी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जेमतेम पावसामुळे पेरण्या आटोपल्या असल्या तरी नदी-नाले मात्र अद्यापही कोरडेठाक आहेत. तालुक्यात भर पावसाळ्यात १२ गावांमध्ये टँकर सुरूच आहेत.

त्यातच निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण सलग चार वर्षांपासून १०० टक्के भरत असल्याने गिरणा पट्ट्यात आबादानी असली तरी यंदा मात्र जुलै संपत आला तरी धरणातील साठा चिंताजनक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणेतील जलसाठा हा १९ टक्क्यांवर स्थिरावला होता. गत आठवड्यात मालेगाव भागात झालेल्या पावसामुळे दोन टक्क्यांनी वाढून २१ टक्क्यांवर पोहचला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girna Dam
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर ओसरणार; जाणून घ्या आजचा हवामानाचा अंदाज

गतवर्षी हाच साठा ९० टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे यंदा सलग पाचव्यांदा हे धरण १०० टक्के भरणार की नाही, याची चिंता असताना मालेगाव भागातील चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गेल्या तीन, चार दिवसांत धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २८) गिरणातील जलसाठा हा २१ टक्क्यांवरून २६ टक्के झाला आहे. आणखी दोन, तीन दिवसांत हा जलसाठा ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्याची तहान भागणार?

गिरणा धरणावर जिल्ह्यातील हजारो हेक्टर सिंचनासह शेकडो पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. गत वर्षात धरणातून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण ५ आवर्तने सोडण्यात आली होती. धरणात ३० टक्क्यांहून अधिक साठा झाल्यास पिण्याची पाण्याची वर्षभराची चिंता मिटते, असे सांगितले जाते. गेल्या पाच, सहा दिवसांत धरणात सात टक्क्यांनी वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Girna Dam
Jalgaon News : जितेशने बनविला अनोखा ‘रोबोट’; मानवी शरीर ‘फॉलो’ करणारे यंत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com