Jalgaon News : म्हसवे प्रकल्पातून भोकरबारीला ‘जलदान’; पारोळा तालुक्यातील गावांना सिंचनासह पाणीप्रश्‍नी दिलासा

Water accumulated in Bhokarbari project from Mhaswe project.
Water accumulated in Bhokarbari project from Mhaswe project.

Jalgaon News : तालुक्यातील भोकरबारी लघुप्रकल्पाची पाणीपातळी वाढण्यासाठी कोणताही प्रवाह नाही. त्यामुळे हा प्रकल्प परावलंबी असतो. ८ सप्टेंबरपासून म्हसवे प्रकल्पाच्या परिसरात पाऊस झाल्यामुळे म्हसवे प्रकल्प ८५ टक्के भरला.

दरम्यान, प्रकल्प ६० टक्के भरल्यानंतर येथील पाणी कडलिंकटद्वारे भोकरबारीत सोडण्यात येते. त्यानुसार म्हसवे प्रकल्पातून भोकरबारीला जलदान करण्यात येत आहे. (water supply to Bhokarbari from Mhasave project jalgaon news)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जलदान करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे भोकरबारी प्रकल्पाचा कायापालट करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. सद्यस्थितीत भोकरबारी प्रकल्पात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वंजारी, उत्रळ यासह आठ ते दहा गावांना याचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांचा आधार म्हणून तामसवाडीच्या बोरी धरणाकडे बघितले जाते. परंतु पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही बोरीपात्रातील जलपातळी वाढलेली नाही. पूर्वीप्रमाणे पाण्याची पातळी २६३.८८० मीटर आहे, तर जिवंत जलसाठा ३.९९१ दलघमी आहे. एकूण १५.८७ टक्के पाणीसाठा धरणात आहे तर धरण क्षेत्रात ०७/२९८ एवढाच मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही दमदार पाऊस नसल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही. अशी स्थिती राहिली तर उन्हाळ्यात या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना अडचणीत येतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water accumulated in Bhokarbari project from Mhaswe project.
Jalgaon GMC News : ‘जीएमसी’त औषध वैद्यकशास्त्र विभागाचे ढिसाळ नियोजन; ‘एचओडी’च्या मनमानीमुळे रुग्णांचे हाल

तालुक्याला जलसंजीवनी ठरलेले हे धरण आज पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.

कडधान्याची स्थिती बिकट

यावर्षी मुख्य पीक कपाशीबरोबर शेतकऱ्यांनी मका व काही प्रमाणात ज्वारी, बाजरी व काही शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून उडीद, मूगची लागवड केली आहे. मात्र वेळेवर पाऊस न झाल्यामुळे तालुक्यातील कडधान्याची परिस्थिती बिकट झाली आहे.

..अन्यथा पारोळ्यावर जलसंकट

दरम्यान, तालुक्यात आठवड्यावर झालेला पाऊस जोरदार होता. त्यामुळे शेती पिकांना त्याचा उपयोग झाला. परंतु आतापर्यंत नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत किंवा ठिकाणी विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. अद्याप देखील तालुक्यातील सात मंडळात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात बोरी प्रकल्प अपूर्ण राहिल्यास पारोळा शहराला पाणी कपात किंवा जलसंकटाला सामोरे जावे लागेल.

Water accumulated in Bhokarbari project from Mhaswe project.
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात पोलिसांनी दूर केले अशांततेचे विघ्न..! अडीच हजार प्रतिबंधात्मक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com